सिंध (पाकिस्तान) येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर करून तिचा विवाह लावून दिला !

इस्लामी पाकिस्तानातील असुरक्षित हिंदु समुदाय !

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या थारपारकर येथील इस्लामोट तालुक्यात असलेल्या गोरानो गावातील एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावून तिचे लग्न लावून देण्यात आले. याविषयी सांगणारा व्हिडिओ पाकिस्तानातील ‘हिंदूज ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक आणि मुख्य संघटक नारायण दास भील यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून प्रसारित केला आहे.

पाकिस्तानी हिंदूंवर ‘त्यांच्या मुली पळून जातात’, असा आरोप नेहमीच केला जातो. त्यामुळे हा व्हिडिओ पहा आणि ठरवा की, खरंच असे आहे कि ‘बळजबरीने त्यांचा अपमान केला जात आहे !’, अशी ट्वीट नारायण दास भील यांनी केले आहे.