सासवड (पुणे) येथे ८० जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद

सासवड (जिल्हा पुणे) – सातारा येथून कोंढवा येथे हत्येसाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळताच ऋषी भागवत आणि त्यांचे सहकारी गोरक्षक ऋषिकेश कामथे, अक्षय पवार आदी १५ नोव्हेंबर या दिवशी येथील सासवड जेजुरी रोडवर गेले असता त्यांना हत्येच्या उद्देशाने ३ ट्रकमधून एकूण ८० म्हशी, रेडके आणि पारडी विनापरवाना घेऊन जात असल्याचे आढळले. (‘नेहमीच गोवंशियांच्या हत्येसाठी त्यांना वाहनातून नेले जात आहे, याची माहिती पोलिसांच्या अगोदर गोरक्षकांना कशी काय मिळते ?’, हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. पोलिसांनी याविषयी उपाययोजना काढावी, अशी अपेक्षा आहे ! – संपादक) याविषयी सासवड पोलिसांना कळवले असता, पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करून वाहनांसह ३६ लाख ४६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक वाहिद कुरेशी,असिफ शेख,शब्बीर मुलाणी, अमीर मुलाणी, महंमद कुरेशी, मुस्तकीन कुरेशी अशा एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे गोरक्षक ऋषी भागवत यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !