रा.स्व. संघ आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हिंसेमध्ये हात नाही !

ब्रिटन येथील लिस्टर हिंसा प्रकरणी ‘हेनरी जॅक्सन सोसायटी’ या तज्ञ मंडळाचा निष्कर्ष

लिस्टर (ब्रिटन) – यावर्षी २८ ऑगस्ट या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर धर्मांध पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात हिंसाचार केला होता. तथापि ‘ही हिंसा हिंदूंनीच घडवली’, अशी आवई उठवण्यात आली होती. यावर आता येथील प्रसिद्ध तज्ञ मंडळ (थिंक टँक) ‘हेनरी जॅक्सन सोसायटी’ने त्याचा अभ्यास मांडला आहे. या हिंसाचारामध्ये रा.स्व. संघ अथवा अन्य कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटनेचा हात नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

अनेक हिंदुद्वेष्ट्या प्रसारमाध्यमांनी या हिंसाचारासाठी हिंदूंनाच दोषी ठरवले होते. या तज्ञ मंडळाने हे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. तज्ञ मंडळाचे संशोधक शार्लोते लिटिलवुड हे लिस्टर येथील हिंदु आणि मुसलमान निवासींना भेटले, तसेच त्यांनी सामाजिक माध्यमे, व्हिडिओ, पोलीस अहवाल अन् साक्षीदारांची विधाने या सर्वांचे सर्वेक्षण करून ते या निष्कर्षाप्रत पोचले.

लिटिलवुड पुढे म्हणाले की, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधात निर्माण करण्यात आले आहे. यामुळे हिंदविषयी द्वेष आणि घृणा पसरण्यासह त्यांच्यावर आक्रमण होण्याची शक्यता वाढली आहे.