किरकोळ अपघात करणारा हिंदु असल्यावरून धर्मांध मुसलमानांच्या जमावाकडून मारहाण

बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना

मारहाण थांबवण्यास गेलेल्या पोलीस शिपायालाही मारहाण

 

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे कपाळावर टिळा आणि मनगटावर दोरा बांधलेल्या हिंदूला पाहून मुसलमानांच्या जमावाने एका किरकोळ अपघातावरून त्याला मारहाण केली. लक्ष्मणपुरी-देहली राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि सायकल यांच्यात किरकोळ धडक झाली. त्यावरून हे आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.

१. कांता प्रसाद वर्मा हे दुचाकीवरून जात असतांना त्यांची झीशान आणि झाकीर यांच्या सायकलला किरकोळ धडक बसली. त्यामुळे वर्मा यांनी झीशान आणि झाकीर यांची क्षमा मागितली; मात्र त्यांच्या कपाळावर टिळा, मनगटावर दोरा आणि गळ्यात देवतेचे पदक पाहून लगेच मुसलमानांच्या जमावाने त्यांना घेरले आणि मारहाण केली. ‘हिंदू आहे. बेदम मारा’ असे ते ओरडत होते. मारहाणीच्या वेळी मुसलमानांची संख्या अधिक असल्याने अन्य कुणीही वर्मा यांना वाचवण्यासाठी पुढे आले नाही.

२. या वेळी पोलीस शिपाई प्रभात कुमार यांनी एका मुसलमान तरुणाला मध्यस्थी म्हणून घेऊन येत मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र मुसलमानांनी प्रभात कुमार यांनाही मारहाण केली. त्यानंतर मारेकरी तेथून पळून गेले.

पोलिसांनी ‘धार्मिक द्वेष आणि पोलिसाला मारहाण’, ही सूत्रे तक्रारीतून वगळायला लावली !

उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांकडून हिंदूंच्या संदर्भात अशा प्रकारची वागणूक दिली जाणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा पोलिसांवर कठोर कावाई झाली पाहिजे !

या प्रकरणी कांता प्रसाद वर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी सांगितल्यानुसार मला तक्रारीमध्ये पालट करावा लागला. पोलिसांनी म्हटले की, ‘तक्रारीमध्ये धार्मिक द्वेष आणि पोलिसाला मारहाण झाली’, असा उल्लेख करू नका.

तक्रार पालटण्याविषयी पोलीस अधिकारी गौरव सिंह यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, याविषयी तुम्ही वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारणा करावी, तेच याचे योग्य उत्तर देऊ शकतात.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना दिवसाढवळ्या एका हिंदूला धर्मांध मुसलमान जमाव जमवून मारहाण करतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !