वाराणसी येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणनेने (एन्.आय.ए.ने) येथून बासित कलाम सिद्दीकी या इस्लामिक स्टेटच्या जिहादी आतंकवाद्याला अटक केली आहे. काश्मीरमध्ये काही आतंकवाद्यांना यापूर्वी पकडण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीवरून बासित याला पकडण्यात आले. तो आतंकवादी आक्रमणासाठी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होता. बासित इस्लामिक स्टेटच्या प्रमुखांच्या संपर्कात होता.

बासित महत्त्वाची स्थाने, तसेच नागरिक यांना लक्ष्य करण्यासाठी स्फोटके जमा करत होता. त्याच्याकडून बाँब बनवण्याच्या संदर्भातील कागदपत्रे, भ्रमणभाष, भ्रमण संगणक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.