मृत तरुणीवर धर्मांधांनी सामूहिक बलात्कार केल्याचा पीडित वडिलांचा दावा

भरतपूर (राजस्थान) – येथे एका महिलेचा बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. आता या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक तथ्य समोर आले आहे. मृत महिलेच्या वडिलांचा दावा आहे की, त्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिला गोमांस खाऊ घालण्यात आले. तसेच तिला बलपूर्वक नमाजपठण करण्यास भाग पाडले.‘माझ्या मुलीला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आली’, असा आरोप पीडित वडिलांनी केला आहे.

या प्रकरणी पीडित वडिलांनी इर्शाद, फयाज, वाहीद, उस्मान, अली आणि कासम  यांच्या विरोधात सिक्री पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, माझ्या मुलीचे ९ मासांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. तेव्हापासून मी तिचा शोध घेत होतो. ४ मासांपूर्वी माझ्या मुलीने अनोळखी भ्रमणभाष क्रमांकावरून माझ्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी तिने स्वत:चे अपहरण झाल्याची माहिती दिली होती. इर्शादने त्याच्या साथीदारांसह तिचे अपहरण केल्याचे तिने सांगितले. सामूहिक बलात्कारानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे, असेही तिने सांगितले होते. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.