इस्लामवर टीका केल्याने १८ वर्षांपूर्वी मी माझे स्वातंत्र्य हिरावून बसलो ! – गीर्ट विल्डर्स

गीर्ट विल्डर्स

ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) – १८ वर्षांपूर्वी मी माझे स्वातंत्र्य हिरावून बसलो. मी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्यावर टीका केल्याने माझ्या विरोधात फतवे निघाले अन् मला जिवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. आज १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमेरिकी चित्रकार बॉश फॉस्टिन यांनी या प्रसंगावर एक व्यंगचित्र बनवले असून ते विक्रीसाठी ठेवले आहे, असे वक्तव्य नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीट करून केले.

वर्ष २००४ मध्ये विल्डर्स यांनी इस्लामविरोधी वक्तव्ये केली होती. १४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी या घटनेला १८ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने विल्डर्स यांनी हे ट्वीट केले. चित्रकार बॉश फॉस्टिन यांनी त्यांच्या ‘theboschfawstinstore’ नावाच्या ब्लॉगवर हे चित्र प्रसारित केले असून त्याच्या १८ प्रती विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असे म्हटले आहे. या चित्राचे मूल्य साधारण ४ सहस्र ५०० भारतीय रुपये आहे.