बांगलादेशमधील श्री कालीमातेच्या मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील झेनाइदह जिल्ह्यातील दौतिया गावातील श्री कालीमाता मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. मंदिराच्या पदाधिकार्‍यांना मंदिरात मूर्तीचे काही तुकडे दिसले आणि मंदिरापासून काही अंतरावर मूर्तीचा काही भाग आढळला, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष सुकुमार कुंदा यांनी दिली. सुकुमार कुंदा म्हणाले की, हे श्री कालीमाता मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी नियमित पूजा होत असते.

याच वर्षी १७ मार्च या दिवशी बांगलादेशमध्ये इस्कॉन मंदिरात तोडफोडीची घटना घडली होती.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

  • मुसलमानबहुल बांगलादेश असो कि हिंदुबहुल भारत असो, अशा प्रकारच्या घटना घडतच असतात !
  • बांगलादेशात केवळ हिंदूच नव्हेत, तर त्यांची धार्मिक स्थळेही असुरक्षित आहेत !