नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
२५ सप्टेंबर २०२२ (आज) या दिवशी सर्वपित्री अमावास्या आहे. त्या निमित्ताने…
पितृपक्षातील (भाद्रपद महिन्यातील) अमावास्येला सर्वपित्री अमावास्या हे नाव आहे. या तिथीला कुळातील सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करतात. वर्षभरात नेहमी आणि पितृपक्षातील इतर तिथींना श्राद्ध करणे जमले नाही, तरी या तिथीला सर्वांनी श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे.
या दिवशी बहुतेक सर्व घरांतून किमान एक तरी ब्राह्मण भोजनाला बोलावतात. कोळी, ठाकूर, कातकरी, कुणबी आदी जातींत पितरांच्या उद्देशाने या दिवशी भाताचे अथवा पिठाचे पिंड देतात आणि आपल्याच जातीतील काही लोकांना जेवायला घालतात. यांच्यात या दिवशी ब्राह्मणांना शिधा देण्याचीही रूढी आहे.
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’
(सौजन्य : परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी – सनातन संस्था)