वाराणसी – युद्ध हे विविध स्तरांवर लढले जाते. त्याप्रमाणे ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून आर्थिक युद्ध लढले जात आहे. या हलाल व्यवस्थेच्या माध्यमातून मिळवलेल्या प्रचंड पैशाचा वापर हा आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी केला जात आहे. या पैशातून आतंकवाद्यांचे न्यायालयीन खटले लढण्यात येतात. त्यामुळे सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी संघटनांनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे, अन्यथा याचा वापर राजकीय शक्ती उभी करण्यासाठी अन् देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत घुसखोरी करण्याचे षड्यंत्र आखण्यासाठी करण्यात येऊ शकतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथे झालेल्या एका बैठकीत केले. या बैठकीत अनेक हिंदु धर्मप्रेमी व्यावसायिकांनी सहभाग घेतला.
सद्गुरु नीलेश सिंगबाळ पुढे म्हणाले, ‘‘भारत लोकशाहीप्रधान राष्ट्र असल्याने आपल्या हिताच्या रक्षणासाठी घटनात्मक पद्धतीने आवाज उठवणे आवश्यक आहे.’’
अभिप्राय : हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या बिकट परिस्थितीविषयी माहिती नसल्याने आम्ही निद्रिस्त होतो. आज आम्ही जागृत झालो आहोत. आता आम्ही समाजालाही जागृत करू. – विकास गुप्ता