महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनासाठी ‘आध्यात्मिक स्तरावरील छायाचित्रे काढणे आणि चित्रीकरण करणे’ या अनमोल सेवेत सहभागी व्हा !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ अध्यात्माचे वैज्ञानिक स्तरावर संशोधन करत आहे. आजवर विविध उपकरणांच्या साहाय्याने या अनुषंगाने सहस्रो प्रयोग करण्यात आले आहेत. जे पुढील काळात अखिल मानवजातीसाठी बहुमोलाचे मार्गदर्शक ठरणारे आहेत. अशा या संशोधनामध्ये ‘चित्रीकरण आणि छायाचित्रीकरण’ हा घटक महत्त्वाचा आहे, ज्याच्या आधारे हे संशोधन जगासमोर मांडणे शक्य होत आहे.

साधना करतांना साधकाची आध्यात्मिक उन्नती होऊ लागली की, ७० टक्के पातळीनंतर, म्हणजेच संत झाल्यावर त्यांच्या देहामध्ये दैवी पालट दिसू लागतात. हे पालट पंचतत्त्वांच्या स्तरांवर दिसून येतात, उदा. तेजतत्त्वामुळे शरिराच्या विविध अवयवांमधून विविध प्रमाणात प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसणे, हाताच्या बोटांमधून उदबत्तीच्या धुराप्रमाणे पांढरा धूर येतांना दिसणे, संतांनी प्रकाश कमी असणार्‍या ठिकाणी हात केल्यास वा त्या दिशेने बघितल्यास तेथील काळपटपणा कमी होणे, तेथे विविध रंगांच्या छटा दिसणे. डोळ्यांनी दिसणारे हे परिणाम सूक्ष्म-स्तरावरील असतात. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला या स्तरावरील चित्रीकरण करणे आणि त्याचे छायाचित्रे काढणे यांसाठी साहाय्याची आवश्यकता आहे. यासाठी या क्षेत्रामध्ये कुणाला अनुभव असल्यास वा कुणाकडे तसे तंत्रज्ञान असल्यास या संशोधनामध्ये सहभागी होऊ शकतात अथवा मार्गदर्शन करू शकतात. यासाठी आम्हाला पुढील पत्त्यावर संपर्क करा.

नाव आणि संपर्क क्रमांक : श्री. अभिजित सावंत – ८७९३६७८१७८

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालासाठी पत्ता : श्री. अभिजित सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.