हिंदूंच्या श्रद्धा, देशाचे सार्वभौमत्व आणि विचारस्वातंत्र्य यांवर होत आहे जिहादी आक्रमण !

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ नावाचे अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या भयावह अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया दिली जाईल, असे हिंदूंच्या अतीसहिष्णु वृत्तीच्या इतिहासातून वाटत नाही. तरीही या हिंसात्मक घटनांचा मागोवा घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकणारा पाक्षिक ‘हिंदु विश्व’मध्ये प्रकाशित झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

या लेखाचा पूर्वार्ध आपण २ सप्टेंबरच्या अंकात पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया. (उत्तरार्ध)

या लेखाचा पूर्वार्ध  वाचण्यासाठी येथे क्लिक करा !https://sanatanprabhat.org/marathi/609508.html

६. भारताला अफगाणिस्तान आणि सीरिया यांसारखा देश बनवायचा आहे का ?

सर्व राज्यांतील पोलीस आणि उन्मादी धर्मांध यांच्या लक्षात आले पाहिजे की, उदयपूर अन् अमरावती यांसारख्या आतंकवादी आक्रमणांच्या विरोधात १०० कोटी हिंदूंनी हिंसक प्रतिक्रिया देणे चालू केले, तर काय होईल ! त्यांना भारताला अफगाणिस्तान आणि सीरिया यांसारखा देश बनवायचा आहे का ? सर्व हिंदूंनी मुसलमान कारागिरांवर बहिष्कार टाकला, तर काय होईल ? देशात लोकांचा विश्वास संपला, तर किती भयानक स्थिती उद्भवू शकते ? याची कल्पना इस्लामी धर्मगुरु आणि विद्वान करू शकतात.

७. भारतीय दंड संहितेमध्ये सुधारणा होणे आवश्यक !

एकाच गुन्ह्यासाठी देशात विविध ठिकाणी गुन्हे नोंदवले जाणे योग्य नाही. सतत धार्मिक भावनांची खिल्ली उडवणार्‍या देशात हे योग्य असले, तरी भारतीय दंड संहितेत सुधारणा करून सर्व प्रकरणात आरोपींच्या सोयीसाठी एका ठराविक ठिकाणी सर्व खटले वर्ग झाले पाहिजेत. विशेषत: महिलांच्या संदर्भात अशी सवलत दिली गेली पाहिजे. एका आरोपीचा खटला एकाच न्यायालयात चालला पाहिजे. अन्यथा भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भात मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. एका आरोपीवर न्यायालयीन प्रक्रियाही एकच आहे. सर्व राज्यांमध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सी.आर्.पी.सी.) यांच्या आधारेच खटला चालणार आहे. असे गृहीत धरा की, धार्मिक भावना भडकावण्याच्या आरोपाखाली बंगालच्या दंडाधिकारी न्यायालयाने एखाद्या आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आणि महाराष्ट्राच्या न्यायालयाने त्याला मुक्त केले, तर काय स्थिती होईल ? ‘पोलीस १५ मिनिटांसाठी हटवा’, यांसारखे वक्तव्य करणारे एम्.आय.एम्.च्या अकबरुद्दीन ओवैसी याला न्यायालयाने सोडले होते. हे आपल्याला माहितीच आहे.

८. ‘क्षमा मागणे’, ही मोठी भावना आणि ‘क्षमा करणे’, त्याहून श्रेष्ठ भावना आहे !

धर्मांध हे ‘नूपुर शर्माने योग्य वेळी क्षमा मागितली नाही’, असा प्रतिवाद करतात. सर्वाेच्च न्यायालयानेही मौखिक प्रतिक्रियेमध्ये म्हटले, ‘नुपूर शर्मा यांनी योग्य वेळी क्षमा मागितली नाही आणि तिच्या अटींवर क्षमा मागितली.’ सर्वाेच्च न्यायालयाच्या मौखिक प्रतिक्रियेला आदेश समजता येत नाही. स्वत: सर्वाेच्च न्यायालयानेच त्यांच्या अनेक निवाड्यांमध्ये म्हटले आहे, ‘सुनावणीच्या वेळी खटला समजण्यासाठी न्यायाधिशांकडून ज्याही प्रतिक्रिया व्यक्त होतात, आवश्यक नाही की, त्या सर्व निर्णयाचा भाग असतात. लिखित भाग हाच निर्णय असेल आणि त्यावर न्यायाधिशांचे हस्ताक्षर असेल.’ याविषयी जेथपर्यंत तथाकथित मुसलमान बुद्धीमंतांच्या मतांचा प्रश्न आहे, तर त्यांना माहिती असले पाहिजे की, सनातन संस्कृतीमध्ये क्षमा भाव दयनीय नाही. तो पुष्कळ महान असतो. आमच्यामध्ये ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ असे म्हटले गेले आहे. अर्थात् क्षमा विरांचे आभूषण आहे. आपल्या कृत्यामुळे कुणाला त्रास होत असेल, तर क्षमा मागणे, ही मोठी मानवीय भावना आहे.

क्षमा करणे, ही त्याहून श्रेष्ठ भावना आहे. ‘क्षमा आणि दया करणे, हे भाव इस्लाममध्ये आहेत कि नाहीत ?’, हे मुसलमानांनी स्पष्ट करावे. ज्या धर्मात ‘त्याच्याहून श्रेष्ठ दुसरा धर्म नाही’, ‘काफिरांचे (अन्य धर्मियांना) कसेही करून धर्मांतर करा, त्यासाठी हिंसाचाराचा आधार घ्यावा लागला, तरी चालेल’, असे शिकवण्यात येते, त्या धर्मियांना क्षमा करणे, ही गोष्ट ठाऊक असेल का ? अशा वेळी कुणी क्षमा मागितली, तरी त्याला क्षमा करण्यात येईल ? काफिरांना कशाही प्रकारे इस्लाम मान्य करायला लावणे, हे ज्या लोकांचे धार्मिक कर्तव्य आहे, त्यांच्या मनात ‘क्षमा’ किंवा दया यांचे भाव प्रकटच होऊ शकत नाहीत.

९. हिंदूंनी क्रियेला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल ? याची भीती बाळगणे आवश्यक !

मुसलमान समाजातील बरेच लोक ‘उदयपूर आणि अमरावती येथे झालेल्या जिहादी आक्रमणांसाठी उत्तरदायी आरोपींवर खटला चालवून त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी’, असे म्हणतात; पण त्यांच्या हेतूवरही संशय निर्माण होतो. भारतात मुसलमान समाज चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे, तरीही त्यांचे काही तथाकथित धर्मगुरु आणि राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी ‘भारतात मुसलमान समाज असुरक्षित आहे’, असा अपप्रचार करत असतात. हे अयोग्य आहे. त्यांनी सामान्य मुसलमानांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. तसेच सद्भावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा; कारण याखेरीज दुसरा पर्याय नाही. हिंदु समाजाने जर क्रियेला प्रतिक्रिया म्हणून भौतिकशास्त्राच्या सिद्धांताला (Every action has an equal and opposite reaction.) सामाजिक सिद्धांत बनवण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल ? याची भीती बाळगण्याची आवश्यकता आहे.’

– रवि पाराशर

(साभार : पाक्षिक ‘हिंदु विश्व’)