आसाममधील मदरशाचा मौलवी निघाला अल् कायदाचा आतंकवादी !

(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते )

आरोपी हाफिजूर रहमान मुफ्ती

गौहत्ती (आसाम)- आसाम पोलिसांनी गोलपारा जिल्ह्यातील जोगीघोपा भागातून अल् कायदाच्या आणखी एका संशयित आतंकवाद्याला अटक करण्यात आली. अटक केलेला आरोपी हाफिजूर रहमान मुफ्ती हा येथील एका मदरशाचा मौलवी आहे. अल् कायदाच्या भारतीय उपखंडातील आतंकवादी कारवायाशी संबंधित संशयितांची एका सप्ताहातील ही चौथी अटक आहे. आरोपी हाफिजूर रहमान मुफ्ती याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती गोलपाराचे पोलीस अधीक्षक व्ही.व्ही. राकेश रेड्डी यांनी दिली.

गेल्या ३-४ वर्षांत मुसलमान तरुणांना कट्टरवादी बनवल्याचा आणि तो स्वतः जिहादी कारवायांमध्ये गुंतल्याचा मौलवी हाफिजूर रहमान मुफ्ती याच्यावर आरोप आहे. गोलपारा जिल्ह्यातून अटक केलेल्या तिघांचा जिहादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे, असे राज्याचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योति महंत यांनी पत्रकारांना सांगितले. (अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनेशी संबंध असलेले मौलवी मदरशांमध्ये मुलांना घडवत आहेत. त्यामुळे अशा मदरशांतून आतंकवादीच निपजणार नाही, तर काय ? सरकारने असे मदरसे तात्काळ बंद करून तेथील मुलांना  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारतात अल्-कायदाची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी कठोर पावले उचलणे आवश्यक !