जगातील १८ देशांत २० लाख रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी !

पाकिस्तान देत आहेत आतंकवादी प्रशिक्षण, तर रोहिंग्यांमुळे भारतात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान !

नवी देहली – म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तेथील रोहिंग्या मुसलमानांनी भारत आणि बांगलादेश व्यतिरिक्त सौदी अरेबिया, मलेशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, कॅनडा, फिनलँड यांच्यासह १८ देशांत घुसखोरी केली आहे. अशा घुसखोरांची एकूण संख्या अनुमाने २० लाख इतकी आहे. पाकिस्तानमध्येही रोहिंग्या मुसलमान मोठ्या संख्येने पोचले आहेत. पाकमध्ये रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करून आतंकवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. आशियातील विविध देशांत पोचलेल्या रोहिंग्यांमुळे तेथील सरकारसमोर डोकेदुखी निर्माण झाली आहे. भारतातही त्यांच्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रोहिंग्यांच्या वास्तव्यामुळे देशात गुन्हेगारी घटनांत वाढ, तसेच कायदा-सुव्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

१. भारतात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान घुसखोरांसाठी आधार कार्ड बनवून देत असल्याचे उघड झाले आहे.

२. भारतातील कडक सुरक्षेमुळे काही रोहिंग्या नेपाळकडे वळले आहेत. रोहिंग्यांना नेपाळमधील जिहादी गटांकडून आर्थिक साहाय्य केले जात असल्याचे सांगण्यात येते.

३. इस्लामी देश असलेल्या इंडोनेशियाने गुन्हेगारीत सहभागी असलेल्या रोहिंग्यांना आश्रय देण्यास सकार दिला आहे. इंडोनेशियामध्ये नौकेतून येणार्‍या रोहिंग्यांना परत पाठवले जात आहेत.

४. ‘बांगलादेशमध्ये ९ लाख २० सहस्र रोहिंग्या मुसलमान आश्रयाला आहेत’, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. ‘रोहिंग्या अमली पदार्थ आणि महिलांची तस्करी यांसारख्या गुन्ह्यांत सहभागी आहेत. ही गोष्ट कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक आव्हान आहे. देशातील अनुमाने ११ लाख रोहिंगे बांगलादेशसाठी समस्या निर्माण करत आहेत’, असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कॅनडाच्या एका अधिकार्‍याला सांगितले होते.

संपादकीय भूमिका

म्यानमारने ज्या कारणामुळे रोहिंग्यांना पिटाळून लावले, तेच कारण १८ देशांना भविष्यात  भोगावे लागेल, यात शंका नाही ! पुढे हे रोहिंग्या या देशांमध्ये देशविरोधी कृत्य आणि कायदा-सुव्यवस्थेला धोकाच निर्माण करणार आहेत. त्यामुळे या देशांनी आताच त्यावर कठोर उपाय काढणे आवश्यक !