‘इसिस मोड्यूल’ प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांवर झालेली कारवाई अपसमजातून !

(मोड्यूल म्हणजे मोठ्या संघटनेचा एक गट)

कोल्हापूर, १ ऑगस्ट (वार्ता.) – ‘इसिस मोड्यूल’ प्रकरणात ३१ जुलै या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ येथील दोघांना कह्यात घेतले होते. हे दोघे जी सामाजिक संस्था चालवत होते, त्या संस्थेचे नाव आतंकवादी संघटनेशी साधर्म्य असलेले होते.

त्यामुळे अपसमजातून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांना कह्यात घेतले होते. अधिक अन्वेषण केल्यावर यंत्रणेला हवे असलेले ‘ते दोघे’ हे नव्हेत, हे लक्षात आल्यामुळे त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आले, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसारित केले आहे.

संपादकीय भूमिका

हे सत्य असेल, तर ‘एवढ्या मोठ्या अन्वेषण यंत्रणेकडून अपसमजातून कारवाई कशी होऊ शकते ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?