वास्को येथे सदनिका भाड्याने देणार्या दलालाने पैसे बुडवल्याचे प्रकरण
वास्को, ३० जुलै (वार्ता.) – वास्को येथील मालमत्तेसंबंधी व्यवहार करणारा दलाल नूर अहमद याने पैसे बुडवल्याची तक्रार शेकडो कुटुंबियांनी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे केली आहे. या कुटुंबियांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. अनेकांना भाडेतत्त्वावर सदनिका देण्याचे आश्वासन देऊन या दलालाने पैसे उकळले आहेत. ज्यांचे पैसे बुडाले आहेत, त्यांपैकी एकाने याविषयी सांगितले की, पोलिसांकडे याविषयी तक्रार देऊन २५ दिवस उलटले आहेत. त्यानंतर पोलिसांनी ‘हे प्रकरण आमच्या अखत्यारित येत नसून तुम्ही आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार करा’, असे सांगितले. (पोलिसांनी तक्रार द्यायला तक्रारदार आला, तेव्हाच कुठे तक्रार करायची ते का सांगितले नाही ? उडवाउडवीची उत्तरे देणार्या पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा ! – संपादक)
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हा दलाल लोकांना संपर्क करून ‘५ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर सदनिका देतो’, असे सांगून त्यांच्याकडून सर्वसाधारणपणे ५ वर्षांचे मिळून ५ लाख रुपये घेत असे. त्या व्यतिरिक्त ‘बाजारातील विविध योजनांमध्ये पैसे गुंतवून तुमचे पैसे व्याजासह परत करीन’, असे सांगून लोकांकडून पैसे घेत असे. सध्या नूर अहमद हा पसार झाला असून त्याच्याशी दूरभाषवरूनही संपर्क होत नाही, असे तक्रारदारांनी सांगितले. (अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत आघाडीवर असलेले मुसलमान ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशी अकार्यक्षमता असल्यानेच गोव्याच्या पोलीस खात्याविषयीच्या विश्वासार्हतेचा दर अल्प आहे ! |