नागपूर येथे १२ वर्षीय मुलीवर बलात्कार !

९ जणांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – येथील १२ वर्षीय मुलीवर ९ जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली. पीडित मुलीचे आई-वडील शेतमजूर आहेत. गजानन मुरस्कर, कुख्यात गुंड रोशन सदाशिव कारगावकर, प्रेमदास गाठीबांधे, गोविंदा नटे, सौरव उपाख्य करण रिठे, राकेश महाकाळकर, नितेश फुकट आणि प्रदुम्न कुरुटकर, निखिल नरुले या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कारामुळे मुलगी बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आल्यावर झालेल्या प्रकाराची वाच्यता न करण्याविषयी तिला ३०० रुपये देण्यात आले आणि कुणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

बलात्कार्‍यांचा देश भारत !