जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे !  

अमेरिकेतील ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांचा निष्कर्ष

नवी देहली – अमेरिकेतील ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी त्यांच्या  अहवालात म्हटले आहे की, जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात असून त्यासाठी हिंदु धर्माविरुद्ध खोटी माहिती पसरवली जात आहे. सामाजिक माध्यमांद्वारे हिंदुत्वविरोधी प्रचारात लक्षणीय वाढ झाली आहे.

या अहवालात मांडण्यात आलेली सूत्रे

१. गेल्या काही वर्षांत हिंदु समाजाच्या विरोधात अपशब्द वापरण्याचे प्रमाण वाढले असले, तरी त्याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही. अलीकडच्या काळात विशेषत: जुलै मासामध्ये त्यात मोठी वाढ झाली आहे.

२.  संशोधकांना असे आढळून आले की, हिंदुविरोधी असलेल्या इराणसह इतर देशांतील सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हिंदूंविषयी दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. अनुमाने १० ट्विट्च्या विश्‍लेषणानुसार, भारतातील अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला जात असल्याचा आरोप करण्यासाठी इराणी लोकांनी मोहीम चालवली आहे.

संपादकीय भूमिका

  • जे विदेशातील विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांना कळते, ते भारतातील संशोधकांना का कळत नाही ?
  • हिंदूंना अपकीर्त करण्याची परंपरा फारच जुनी आहे. याविरोधात हिंदू संघटितपणे कृती करत नसल्याने असे प्रकार थांबत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयातील ऑड्री ट्रश्के या हिंदुद्वेष्ट्या प्राध्यापिका हिंदूंविरोधात सातत्याने गरळओक करत असून अमेरिकेत हिंदुद्वेषी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सदर संशोधकांनी त्यांचा निषेध करणेही आवश्यक आहे !