शाहनवाझने शीख मुलीला फसवून केला बलात्कार, तसेच वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणला दबाव !

३ मासांपूर्वी पोलिसांत तक्रार करूनही पोलीस निष्क्रीय !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील एका शीख मुलीने शाहनवाझ याच्यावर बलात्कार करणे, धर्मांतरासाठी दबाव आणणे, लाखो रुपये लुबाडणे, तसेच वेश्याव्यवसाय करण्यासाठी बळजोरी करणे, असे गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने ११ एप्रिल या दिवशी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती; परंतु ३ मास उलटूनही त्याच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आलेला नाही, तसेच कोणतीच कारवाईही करण्यात आलेली नाही.

तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की,

१. शाहनवाझ साधारण ७-८ वर्षांपूर्वी मला भेटला. त्याने स्वतःचे नाव ‘सुमित यादव’ असे सांगितले. काही दिवसांनी त्याने माझ्यासमवेत बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तो माझ्याशी विवाह करण्यास मात्र टाळाटाळ करत होता.

२. डिसेंबर २०१८ मध्ये मला त्याच्यापासून मुलगा झाला. कालांतराने तो माझ्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव बनवू लागला. मी त्यास विरोध केला. त्यानंतर तो मला प्रतिदिन मारहाण करत असे.

३. मी घर विकत घेण्यासाठी ८ लाख रुपये जमा केले होते. तेही त्याने लुबाडले.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेश पोलिसांनी अशा प्रकरणांत निष्क्रीय रहाणे लज्जास्पद ! अशा गंभीर घटनांविषयी असंवेदनशील रहाणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना सरकारने बडतर्फ का करू नये ?