१. ‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी ज्या जिवांमध्ये दैवी गुणांचा समुच्चय वृद्धींगत केला आहे, ते जीव म्हणजे सनातनचे साधक !
२. परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी तेजस्वी सूर्यामुळे अनेक संत-साधक पुष्पे फुलली आहेत आणि ती हिंदु राष्ट्रासाठी समर्पित झाली आहेत. अनेक कळ्या (बालसाधक) उमलत असून त्या हिंदु राष्ट्रासाठी समर्पित होण्यास आतुर आहेत !
३. एकमेवाद्वितीय असलेली सनातन संस्था !
‘मनुष्याला योग्य-अयोग्य कळत असले, तरी त्याप्रमाणे वागायचे कि नाही ?’, हे त्या मनुष्याची वृत्ती किंवा त्याची विवेकबुद्धी यांवर अवलंबून असते. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन प्रक्रियेद्वारे वृत्ती परिवर्तनाचे प्रशिक्षण देणारी सनातन संस्था केवळ एकमेवाद्वितीय आहे.
४. सनातनचा आश्रम म्हणजे साधकांतील गुणांचा साधकांच्या उद्धारासाठी आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी प्रभावी उपयोग करायला शिकवणारे ‘विश्वविद्यालयच’ आहे !
जीवनाचा कायपालट करणाऱ्या अशा आश्रमांची निर्मिती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः वंदन !’
– श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे राज्य समन्वयक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२२)