साधकांची साधना चांगली झाल्यावरच पूर्ण सात्त्विक आणि परिपूर्ण हिंदु राष्ट्र येऊ शकणे

श्री. आर्. विश्वनाथ

१. ‘हिंदु राष्ट्र जवळ आले’, असे वाटून आनंद होणे; पण काही काळाने ते २ वर्षे पुढे गेल्याचे कळल्यावर मनात प्रश्न निर्माण होणे

आमच्या गावात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सांगितले होते, ‘वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र येईल.’ वर्ष २०२३ जवळ आलेच आहे; म्हणून मला पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर ४-५ मासांपूर्वी शिवमोग्गा येथे झालेल्या सत्संगात आम्हाला सांगितले, ‘वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे. तोपर्यंत सर्वांनी साधनेत प्रगती करण्यासाठी उत्तम साधना करावी.’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मला हिंदु राष्ट्र लवकर पहायचे आहे; परंतु ते २ वर्षे पुढे का गेले ?’

२. ‘हिंदु राष्ट्र’ हे शुद्ध तुपाप्रमाणे असणे, शुद्ध आणि सात्त्विक तूप मिळण्यासाठी सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी देणे आवश्यक असणे

मला दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सेवेसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी रामनाथी आश्रमात आल्यावर मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला आहे. दुधापासून तूप सिद्ध होईपर्यंत त्याला अनेक टप्प्यांतून जावे लागते. ते सर्वच टप्पे अतिशय महत्त्वाचे असून एकाही टप्प्यात काही चुकले, तर तूप व्यवस्थित होत नाही. हिंदु राष्ट्र हे शुद्ध तुपाप्रमाणे आहे. शुद्ध तूप सर्वांना आवडते आणि भावते. त्याचा सांभाळही करावा लागतो. त्यासाठी व्यवस्था केली जाते. तूप सात्त्विकच असते. त्याप्रमाणेच हिंदु राष्ट्र आहे. ‘सर्वच ते अनुभवतील आणि जगतील’, अशी मला हिंदु राष्ट्राची अनुभूती आली.

– श्री. आर्. विश्वनाथ, शिवमोग्गा, कर्नाटक. (७.६.२०२२)