पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘यशवंतराव चव्हाण स्मृती’ रुग्णालयामध्ये (वाय.सी.एम्.) ५ ते ६ मासांपासून शस्त्रकर्म विभागात आवश्यक असणारी यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना शस्त्रकर्मासाठी ३ ते ४ मास वाट पहावी लागत आहे. काही रुग्ण शस्त्रकर्माविना घरी जात आहेत, अशी तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
रुग्णालयातील शस्त्रकर्म विभागामध्ये फोरके दुर्बीण, शस्त्रकर्म खोली निर्जंतुकीकरण करणारे यंत्र आदी यंत्रे उपलब्ध नाहीत. या उपकरणांची खरेदी अधिकारी, माजी पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या राजकारणातून होऊ शकलेली नाही. ही यंत्रसामुग्री त्वरित खरेदी करून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकारुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |