शाळांमध्ये विद्यार्थी डॉ.  हेडगेवार यांचा नाही, तर जिनांचा धडा शिकणार का ? – कर्नाटकमधील भाजपचे आमदार ईश्वरप्पा

ईश्वरप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा नाही, तर महंमद अली जिना यांचा धडा शिकणार का ? असा संतप्त प्रश्न राज्यातील माजी मंत्री आणि भाजपचे आमदार ईश्वरप्पा यांनी विचारला. ईश्वरप्पा म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या भाषणांवर आधारित धडा समाविष्ट करण्यामागे ‘भारताची संस्कृती आणि राष्ट्रभक्ती अधिक सशक्त करणे’, हा उद्देश आहे.

राज्यात ३६ सहस्र मंदिरे पाडून मशिदी बनवलेल्या जागांवर हिंदू कायदेशीर दावा करणार !

ईश्वरप्पा पुढे म्हणाले की, राज्यात ३६ सहस्र मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत. मशीद अन्य कुठेही बांधून तेथे नमाजपठण करता येऊ शकते; मात्र आमची मंदिरे पाडून त्यावर मशीद बांधण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. या सर्व ३६ सहस्र मंदिरांविषयी कायदेशीर दावा करण्यात येईल.