हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत देशभरात व्यापक धर्मप्रसार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त…

परात्पर गुरु डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्य करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात श्रीरामनवमीपासून (१०.४.२०२२ पासून) ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी मंदिरांत देवतांना साकडे घालणे, समस्त हिंदूंच्या संघटनासाठी हिंदू एकता दिंडी काढणे, तणावमुक्त आणि आनंदी जीवनासाठी साधना प्रवचनांचे आयोजन करून अध्यात्मप्रसार करणे, चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी मंदिरांची स्वच्छता करणे आणि धर्मज्ञान देणाऱ्या सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, उत्तर भारतात देहली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश, तसेच पूर्वाेत्तर भारतातही हे उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या आयोजनात ३३ सहस्र २९६ हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना-संप्रदाय यांचे प्रतिनिधी, सनातन संस्थेसह विविध आध्यात्मिक संस्थांचे साधक मंदिरांचे पुजारी आणि भक्त यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमांच्या वेळी हिंदु संघटनातून उपस्थितांमध्ये हिंदु राष्ट्राचे स्फुल्लिंग चेतले आणि अनेकांना आध्यात्मिक अनुभूतीही आल्या.

या उपक्रमांची १० मेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे –

(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)