करवीरनगरीत ३ सहस्र हिंदूंचा हिंदु ऐक्‍याचा जागर !

  • भाव, चैतन्‍य आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम असलेली कोल्‍हापूर येथील हिंदु एकता दिंडी !

  • सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान !

कोल्‍हापूर येथे निघालेली भव्‍य हिंदु एकता दिंडी

कोल्‍हापूर, ३० मे (वार्ता.) – सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर येथे २९ मे या दिवशी काढण्‍यात आलेल्‍या हिंदु एकता दिंडीत हिंदु ऐक्‍याचा जागर झाला. विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना-संप्रदाय, पक्ष, आध्‍यात्मिक संस्‍था, जिज्ञासू, वाचक, हितचिंतक अशा ३ सहस्रांहून अधिक हिंदूंनी दिंडीत सहभागी होऊन धर्मभक्‍तीचा जागर केला. या दिंडीत विविध अशा ३० पथकांचा समावेश होता. दिंडीतील पथके त्‍या सादरीकरणाशी इतकी एकरूप झाली होती की, ही दिंडी अशीच चालू रहावी, असे वाटत होते. या फेरीला सनातन संस्‍थेचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब, तसेच  पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली.

अशी झाली दिंडी

१. मिरजकर तिकटी येथे भ्रष्‍टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रदेश उपाध्‍यक्ष श्री. आनंदराव पवळ यांच्‍या हस्‍ते धर्मध्‍वजपूजनाने दिंडीचा प्रारंभ झाला. या प्रसंगी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्री महालक्ष्मीदेवी यांच्‍या पालखीचे पूजन श्री. उदयसिंह देसाई आणि सौ. ऐश्‍वर्या देसाई यांनी, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पालखीचे पूजन शिवसेनेचे श्री. उदय भोसले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी ह.भ.प. महादेव रामचंद्र यादव महाराज, तसेच ह.भ.प. विठ्ठलतात्‍या पाटील यांचीही उपस्‍थिती होती.

२. सनातन संस्‍थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी दिंडीचा उद्देश स्‍पष्‍ट केला. यानंतर दिंडी मार्गस्‍थ झाली. मिरजकर तिकटी येथून प्रारंभ झालेल्‍या दिंडीची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सांगता झाली.

३. दिंडीच्‍या समारोपप्रसंगी उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. शरद माळी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

हनुमानाची गदा घेऊनी दिंडीत सहभागी झाले गदापथक : दिंडीत गदापथकाचा समावेश होता. या पथकाने मध्‍ये मध्‍ये हनुमंताचा जागर केला.

उपस्‍थित मान्‍यवर

शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, अधिवक्‍ता संजय पाटील, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष श्री.शामजोशी, मलकापूर येथील श्री. रमेश पडवळ, केर्ली येथील शिवसेनेचे श्री. भीमराव पाटील, शिवसेनेचे श्री. दुर्गेश लिंग्रज, उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्‍हा प्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, ‘वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशन’चे श्री. अवधूत भाट्ये, हिंदु धर्म मंडळ संस्‍थेचे विश्‍वस्‍त श्री. हसमुखभाई शहा, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्‍हापुरे, धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, हिंदू एकताचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्‍यक्ष श्री. गजानन तोडकर

क्षणचित्रे

१. श्री महालक्ष्मीदेवी,  सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या प्रतिमा असलेल्‍या पालख्‍या यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेली पालखी होती.

२. श्रीकृष्‍ण झालेल्‍या साधिकेसमवेत श्रीकृष्‍णाची भक्‍ती करणारे नृत्‍य या वेळी गोपी बनलेल्‍या साधिकांनी सादर केले.

३. ह.भ.प. विठ्ठल तात्‍या पाटील यांच्‍या वारकरी पथकाचा या दिंडीत सहभाग होता. यात मृदंग-टाळ यांच्‍या नादावर लहान मुलांनी केलेल्‍या नृत्‍याने कोल्‍हापूरकरांची मने जिंकली.

सहकार्य – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, हिंदु एकता आंदोलन, तसेच गजानन महाराज भक्‍त मंडळाचे श्री. अमित माने आणि त्‍यांचे सहकारी यांच्‍या वतीने पाणीवाटप करण्‍यात आले.

सहभागी संस्‍था

वारकरी  संप्रदाय, श्री संप्रदाय, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, ‘इस्‍कॉन’, विविध भजनी मंडळे, भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, पतित पावन संघटना, कोल्‍हापूर जिल्‍हा ब्राह्मण पुरोहित संघ, हिंदु एकता आंदोलन, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, हिंदु महासभा यांसह विविध संघटना आणि संप्रदाय

दिंडीत बालशिवाजीच्‍या वेशभूषा करण्‍यात आली होती. यामुळे ऐतिहासिक स्‍मृतींना उजाळा मिळाला

विशेष

१. ‘श्रीराम गुरुकुलम्’चे प्रमुख आचार्य विशाल निकम यांच्‍या मार्गदर्शनाखाली दिंडीच्‍या मार्गावर ठिकठिकाणी सादर केलेले मर्दानी खेळ, प्राचीन युद्धकला पथकाने सादर केलेली प्रात्‍यक्षिके यांनी उपस्‍थितांची मने जिंकली. यात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांसह अन्‍य युद्धकलांचा समावेश होता. दिंडीत श्री. अभिजित शिंदे यांचा ‘बुधवार पेठ आखाडा’ या पथकानेही मर्दानी खेळांची प्रात्‍यक्षिके दाखवली.

‘श्रीराम गुरुकुलम’च्‍या पथकातील मावळ्‍यांनी दिंडीच्‍या मार्गावर ठिकठिकाणी मर्दानी खेळ, प्राचीन युद्धकला सादर करून उपस्‍थितांची मने जिंकली

२. धर्मध्‍वजपूजनाप्रसंगी श्री. विठ्ठल गणेश नरवणे यांनी बासरीवादन केले, तसेच दिंडीच्‍या मार्गातही त्‍यांनी ठिकठिकाणी बासरीवादन केले.

धर्मध्‍वजपूजनप्रसंगी श्री. विठ्ठल गणेश नरवणे यांनी बासरीवादन केले, तसेच दिंडीच्‍या मार्गातही त्‍यांनी ठिकठिकाणी बासरीवादन केले.

३. भुये येथील ७० वर्षीय श्रीमती यशोदा पाटीलआजी दिंडीत प्रथमच सहभागी झाल्‍या होत्‍या. ‘दिंडीत सहभागी झाल्‍याने त्‍यांच्‍या जीवनाचे कल्‍याण झाले’, असा त्‍यांचा भाव होता आणि ‘गुरुदेवांची पालखी कुठे आहे’, असे विचारून त्‍यांनी पालखीला भावपूर्ण नमस्‍कार केला.

४. सहभागी असलेले प्रत्‍येक पथक हे त्‍या पथकातील कृतीशी एकरूप होते. जसे भजन म्‍हणणारे भजनानंदात डुंबून गेले होते, स्‍वरक्षण करणार्‍यांचे प्रशिक्षण पाहून उपस्‍थितांमध्‍ये क्षात्रतेज जागृत झाले. राधा-कृष्‍णाचे पथक पाहून उपस्‍थितांना प्रत्‍यक्ष श्रीकृष्‍णच आहे, असे जाणवत होते. पथकांची अर्चन-वंदन-भक्‍ती पहाणार्‍यांमध्‍ये भावजागृत करणारी होती.

दिंडीत कलशघेऊन महिला सहभागी झाल्‍या होत्‍या.

५. या दिंडीत अनेक नवीन जिज्ञासू, हिंदुत्‍वनिष्‍ठ, आध्‍यात्मिक संस्‍था हे प्रथमच दिंडीत सहभागी होते. ते शेवटपर्यंत दिंडीत सहभागी होते. दिंडी मार्गक्रमण करत असतांना हिंदुत्‍वनिष्‍ठांनी उत्‍स्‍फूर्तपणे घोषणा दिल्‍या.

६. भुयेवाडी येथील लेझीम पथक आणि ढोलपथक यांनी सादर केलेल्‍या कलाकृतीने उपस्‍थितांची मने जिंकली.

७. दिंडी श्री महालक्ष्मी मंदिराजवळ आल्‍यावर सहस्रो भाविकांनी दिंडीचे दर्शन घेतले. अनेकांनी भावपूर्ण, शिस्‍तबद्ध दिंडी पाहून कौतुक केले आणि पालख्‍यांचे दर्शनही घेतले.

श्री महालक्ष्मी देवी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्र असलेल्‍या पालख्‍या

दिंडीचे विविध संस्‍था, संघटना, व्‍यक्‍ती, तसेच मान्‍यवर यांच्‍याकडून झालेले स्‍वागत

१. मिरजकर तिकटी येथे ‘श्री दास महाराज स्‍वामी समर्थ भक्‍त मंडळा’चे श्री. अवधूत भाटे दांपत्‍याने स्‍वागत केले.

२. दैवज्ञ बोर्डिंग येथे श्री. अनिल नागवेकर यांनी स्‍वागत केले.

३. खरी कॉर्नर येथे श्री. विशाळ शिराळकर, श्री. किलकिले आणि श्री. संतोष लाड यांनी स्‍वागत केले. या प्रसंगी भाजपच्‍या महिलाआघाडी प्रमुख सौ. गायत्री देसाई यांनीही दिंडीवर पुष्‍पवृष्‍टी केली. या प्रसंगी उद्योजक श्री. शिवप्रसाद सातपुते उपस्‍थित होते.

खरी कॉर्नर येथे दिंडीचे स्‍वागत करण्‍यात आले ते क्षण

४. बिनखांबी गणेश मंदिर येथे सुरुची भोजनालयाच्‍या वतीने तसेच सौ. पौर्णिमा पाटणकर यांनी पुष्‍पवृष्‍टी केली.

५. महाद्वार रोड येथे गजानन महाराज भक्‍त मंडळाचे श्री. अमित माने आणि त्‍यांचे सहकारी यांनी स्‍वागत केले. येथे ब्राह्मण महासंघाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष श्री. शाम जोशी आणि त्‍यांचे सहकारी यांनी स्‍वागत केले.

मिरजकर तिकटी येथे धर्मध्‍वजाचे पूजन करतांना भ्रष्‍टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रदेश उपाध्‍यक्ष श्री. आनंदराव पवळ

६. गुजरी कॉर्नर, महाद्वार रोड येथे पंचगंगा बँकेच्‍या माजी अध्‍यक्षा सरोज सातपुते आणि श्री मेटल भांडी दुकानदार यांच्‍या वतीने स्‍वागत करण्‍यात आले.

७. भेंडे गल्ली येथे श्री. अशोक राऊत यांनी स्‍वागत केले.

८. पापाची तिकटी येथे उद्योजक श्री. अमित ठोमके यांनी स्‍वागत केले.

९. नगरपालिकेजवळ श्री. अभिजित ओतारी आणि श्री. प्रकाश लांडगे यांनी स्‍वागत केले.

१०. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्‍याजवळ दिंडीच्‍या समारोपप्रसंगी काही धर्मप्रेमींनी उत्‍स्‍फूर्तपणे फेरीचे स्‍वागत केले.

विशेष अभिप्राय

१. श्री. आनंद मोहरी, देहली – ज्‍या पद्धतीने या दिंडीचे आयोजन करण्‍यात आले होते. ते खरोखरच अप्रतिम होते. आज तुम्‍ही ज्‍या पद्धतीने हिंदू ऐक्‍याचे दर्शन घडवले. ती काळाची आवश्‍यकता आहे.