त्रिशूर (केरळ) येथील उत्सवातील चित्रफेर्‍यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राच्या वापराला काँग्रेस आणि माकप यांचा विरोध

त्रिशूर (केरळ) – येथील त्रिशूर पूरम उत्सवामध्ये विविध चित्रफेर्‍या काढण्यात येतात. त्यांतील ‘परमेक्कावू देवस्वम्’कडून काढण्यात येणार्‍या चित्रफेरीसाठी वापरण्यात येणार्‍या छत्र्यांवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. या छत्र्यांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांनी आक्षेप घेतल्याने त्यांना वेगळे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उत्सवामध्ये विविध मंदिरांच्या समुहांचा सहभाग असतो. त्यातील काहींनी म. गांधी, भगतसिंह आदींची छायाचित्रे वापरली आहेत.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असा विरोध करणारे काँग्रेस आणि मापक राष्ट्रघातकीच होत !