भावी हिंदु राष्ट्र कसे असेल ?

पू. तनुजा ठाकूर

‘हिंदु राष्ट्र रामराज्यासारखे असेल आणि रामराज्याचे वर्णन करतांना संतशिरोमणि गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहिले आहे,

दैहिक दैविक भौतिक तापा ।
राम राज नहिं काहुहि ब्यापा ।।

सब नर करहिं परस्पर प्रीती ।
चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती ।। १।।

अर्थ : ‘रामराज्यात कुणाला दैहिक, दैविक आणि भौतिक ताप होत नाहीत. सर्व मनुष्य परस्परांवर प्रेम करतात आणि वेदांमध्ये सांगितलेल्या नीतीचे (मर्यादेचे) पालन करून धर्माचे पालन करतात.’

आज समाज साधना करत नसल्यामुळे सर्व प्रकारच्या तापांशी (समस्यांशी) झुंज देत दुःखी आहे; मात्र तोच समाज पुढे येणाऱ्या हिंदु राष्ट्रात (रामराज्यात) साधना करू लागल्यावर सुखी आणि आनंदी बनेल. त्याच प्रकारे धर्मपालन केल्यामुळे समाजातील सर्व जण साधकवृत्तीचे होतील आणि सांप्रतकाळानुसार तेथे चोरी, हिंसा, रक्तपात, जातीय दंगली इत्यादी होणार नाही. सर्वत्र शांती आणि बंधूभाव असेल.

चारिउ चरन धर्म जग माहीं । पूरि रहा सपनेहुं अघ नाहीं ।।
राम भगति रत नर अरु नारी ।सकल परम गति के अधिकारी ।। २ ।।

अर्थ : धर्म आपल्या चारही चरणांनी (सत्य, शौच, दया आणि दान यांनी) जगात परिपूर्ण होत आहे. स्वप्नातही कुठे पाप नाही. पुरुष आणि स्त्री सर्व जण श्रीरामाची भक्ती करतात आणि सर्व जण मोक्षाचे अधिकारी आहेत.

हिंदु राष्ट्रात सर्व जण धर्मपरायण असतील. सर्व जण साधनेला प्राधान्य देतील; म्हणून ईश्वरी कृपेचे अधिकारीसुद्धा होतील. अशा प्रकारे हिंदु राष्ट्र एक आदर्श राष्ट्र होईल !’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ(डिसेंबर २०२१)