बनारस हिंदु विश्‍वविद्यालयात कुलपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – बनारस हिंदु विश्वविद्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विश्वविद्यालयातील महिला महाविद्यालयामध्ये २७ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टीचा विरोध करण्यात आला. इफ्तार पार्टी आयोजित करणारे कुलगुरु प्रा. सुधीर जैन यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात मोर्चा काढून त्यांचा पुतळा जाळला. या इफ्तार पार्टीला महिला महाविद्यालयातील मुसलमान शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी डॉ. महंमद अफझल हुसैन यांच्या नेतृत्वाखाली रोजा आणि रमझान यांच्यावर चर्चाही करण्यात आली.


१. याविषयी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘गेली अनेक वर्षे येथे इफ्तारचे आयोजन होत नव्हते. अचानक कुलगुरु यांनी बनारस हिंदु विश्वविद्यालयाला ‘जामिया मिलिया उस्मानिया विश्वविद्यालय’ (मुसलमानांचे विश्वविद्यालय) बनूवन टाकले. हा मुसलमानांच्या लांगूलचालनाचाच प्रयत्न आहे.’

२. इफ्तारच्या मेजवानीनंतर विश्वविद्यालयाच्या परिसरातील भिंतींवर हिंदुविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. ‘कश्मीर तो बस झांकी है, पूरा कश्मीर बाकी है’, ‘ब्राह्मणों तेरी कब्र खुदेगी बीएच्यू (बनारस हिंदु विश्वविद्यालय) की धरती पर’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. (विश्वविद्यालयामध्ये इफ्तारचे आयोजन करून कुलगुरूंनी काय साध्य केले ? धर्मांधांचा हिंदुद्वेष आणि राष्ट्रद्वेष आहे, तसाच आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मुसलमान विद्यार्थ्यांमध्ये कट्टरतावाद पसरवण्यासाठी ‘अलीगड मुस्लिम विद्यापिठा’ची स्थापना करण्यात आली, तर भावी पिढी ही राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कृत निपजण्यासाठी बनारस हिंदु विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. बनारस विश्वविद्यालयातील ‘हिंदु’ शब्द ही त्याची खरी ओळख आहे. तीच पुसून टाकण्याचा प्रयत्न स्वतः कुलगुरूंकडून होत असेल, तर ते संतापजनक होय ! 
  • धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘हिंदूं’चे म्हणून ओळखले जाणारे भारतातील विश्वविद्यालय इफ्तारचे आयोजन करते; मात्र मुसलमानांच्या शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालये येथे आरती किंवा पूजा यांचे आयोजन केले जाते का ? हिंदूंमधील आत्मघातकी धर्मनिरपेक्षता एक दिवस त्यांना विनाशाच्या खाईत लोटणार, हे निश्चित !