आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

मुंबई – १७ एप्रिल या दिवशी आरे कॉलनीतील गौतमनगरमधील शिवमंदिराच्या ठिकाणी कलशयात्रा काढणाऱ्या हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदू आणि दगडफेक करणारे काही लोक यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणी २५ हून अधिक जणांवर गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कलशयात्रा एका भागातून जात असतांना तेथील एका जमावाने यात्रा रोखून धरली. या वेळी हिंदु आणि एका जमावातील लोक यांच्यात वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हिंसेत झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. याविषयी पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे म्हणाले की, या घटनेनंतर शिवमंदिर झाकण्यात आले असून ध्वनीवर्धक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

असलेल्या हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर जमावांकडून आक्रमण होणारा एकमेव देश भारत ! असे प्रकार रोखून हिंदूंचे हित साधण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !