पुजार्याच्या घराचीही तोडफोड
मद्याच्या बाटल्या सापडल्या
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणार्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे !
चमोली (उत्तराखंड) – येथील प्राचीन रुद्रनाथ मंदिरामध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या परिसरातील काही भागाची तोडफोड करण्यात आली. तसेच या भागात असणार्या एका पुजार्याच्या घराची आणि अन्य काही लोकांच्या दरवाजांची तोडफोडही करण्यात आली. येथे मद्याच्याही बाटल्या सापडल्या. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही घटना ९ एप्रिल या दिवशी घडल्याचे सांगितले जात आहे.
उत्तराखंड के चमोली जिले में स्थित पौराणिक रुद्रनाथ मंदिर में तोड़फोड़ हुई है। प्रांगण के आसपास के भवन भी क्षतिग्रस्त किए गए। हिन्दू समाज नाराज़।https://t.co/26d3Zb0u7i
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 11, 2022
मंदिराचे पुजारी हरीश भट्ट यांनी सांगितले की, हिवाळ्याच्या दिवसात हे मंदिर बंद असते. आता जेव्हा हे मंदिर उघडण्यात येत होते, तेव्हा काही लोक येथे आले आणि त्यांनी तोडफोड केल्याची माहिती आम्हाला मिळाली. केदारनाथ वन विभागाने या मंदिराच्या ठिकाणी त्यांचे गस्तीपथक पाठवल्यावर ही घटना समोर आली. तसेच येथे रहिवासी भागातही तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आले. माझ्या येथील घराचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत चौथ्यांदा या मंदिरामध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.
रूद्रनाथ मंदिर और पुजारी आवास के दरवाजे टूटे मिले, पुजारियों ने की कार्रवाई की मांग https://t.co/QUcl8d5h2X
— AAJ NEWS (@AAZNEWS1) April 9, 2022
या घटना चोरीसाठी नाही, तर धार्मिक भावना दुखावण्यासाठीच घडल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत याची माहिती पोचवली पाहिजे. हा भाग आता पर्यटनाचे स्थान झाले आहे. येथे मद्याच्या बाटल्याही सापडतात. येथे गोव्याची संस्कृती आली आहे. लहान मुलेही मद्य पिऊन जातात. याविषयी सर्वच धर्मगुरूंनी बोलले पाहिजे. प्रशासनाने कारवाई केली पाहिजे.