उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर खाते हॅक !

उत्तरप्रदेशसारख्या एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर खाते जिथे हॅक होऊ शकते, तिथे सर्वसाधारण नागरिकाच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांची सुरक्षितता कितपत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !

नवी देहली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे ट्विटर खाते ८ एप्रिलच्या रात्री उशिरा हॅक करण्यात आले (अनधिकृतपणे नियंत्रण मिळवण्यात आले). हॅकर्सनी आधी खात्यावरील त्यांची माहिती आणि नंतर ‘@CMOfficeUP’ या ट्विटर हँडलचा ‘प्रोफाइल फोटो’ (मुख्य छायाचित्र) पालटले.

त्यानंतर ५० हून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर खाते हॅक झाल्याची बातमी समजताच मध्यरात्री संपूर्ण यंत्रणा सक्रीय झाली. २५ मिनिटांतच ट्विटर हँडल पूर्ववत् करण्यात आले. हॅकर्सने केलेल्या सर्व ट्वीट्स पुसण्यात आल्या.