पुतिन सत्तेवर राहू शकत नाहीत ! – जो बायडेन यांची टीका

वॉर्सा (पोलंड) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सत्तेत राहू शकत नाहीत, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी टीका करतांना केले. ‘या विधानामागे नेमके काय कारण आहे ?’, अशी विचारणा होऊ लागल्यानंतर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण देत ‘बायडेन यांच्या वक्तव्याचा अर्थ रशियात नवीन सरकारची मागणी करणे नाही’, असे म्हटले आहे. यावर रशियाने प्रतिक्रिया देतांना म्हटले, ‘रशियामध्ये सत्तेवर कोण असेल, हे ठरवण्याचा अधिकार बायडेन यांना नसून रशियाच्या नागरिकांना आहे.’

जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.