हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘क्रूर टिपू सुल्तान : दक्षिण भारत का औरंगजेब ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
मुंबई – टिपू सुलतान आणि औरंगजेब यांना भारतीय संस्कृतीशी काही देणे-घेणे नव्हते. टिपूच्या शासन काळात सहस्रो हिंदु मंदिरांचा विध्वंस करण्यात आला, हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, हिंदु स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले, हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करण्यात आले. हिंदु संस्कृतीचा विनाश करण्याचे कामच टिपू सुलतानने केले, हे सर्व इतिहासात उपलब्ध आहे. अशा स्थितीत टिपू सुलतानचे भारतियीकरण करून त्याला आदर्श मानून कुणी राष्ट्रीय नायक बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे भारतियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. भारत कधीच टिपूला ‘नायक’ म्हणून स्वीकारणार नाही. टिपू सुलतान हा खलनायक होता आणि खलनायकच राहील, असे प्रतिपादन इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक-लेखक तथा अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘क्रूर टिपू सुलतान : दक्षिण भारत का औरंगजेब ?’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादामध्ये ते बोलत होते. या संवादामध्ये विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रमंत्री श्री. शंकर गायकर अन् हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सहभाग घेतला.
टिपू सुलतान क्रीडा संकुलावर कठोर कारवाई होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठांचा विरोध चालूच रहाणार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी टिपू सुलतान आणि मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाते. केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर सध्याची शिक्षणव्यवस्था अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत चुकीचा इतिहास आपल्याला शिकवत आहे. हा इतिहास पालटला पाहिजे. मुंबईत अवैधरित्या बांधलेल्या ‘टिपू सुलतान क्रीडा संकुला’वर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोध चालूच राहील.
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में – ‘क्रूर टिपू सुल्तान : दक्षिण भारत का औरंगजेब ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद
क्रूर टीपू सुल्तान : दक्षिण भारत का औरंगजेब । Brutal Tipu Sultan : Aurangzeb of South India! https://t.co/LUkXU6IXxH
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 2, 2022
टिपू सुलतानचे उदात्तीकरण रोखणे, हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह सर्व हिंदूंचे दायित्व ! – शंकर गायकर, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रमंत्री, विहिंपहिंदूंनी शिथिलता आणि सद्गुण विकृती यांमुळे स्वतःची पुष्कळ हानी करून घेतली आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतानचे कौतुक या देशात होता कामा नये. टिपू सुलतानचे उदात्तीकरण रोखणे, हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह सर्व हिंदूंचे दायित्व आहे. |