संयुक्त अरब अमिरातमधील नव्या श्रम कायद्याचा भारतीय कामगारांना लाभ होणार

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) – संयुक्त अरब अमिरातमध्ये २ फेब्रुवारीपासून नवीन श्रम कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याद्वारे कामगारांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे भारतातून या देशात कामानिमित्त जाणार्‍या नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. संयुक्त अरब अमिरातच्या एकूण लोकसंख्येत ४० टक्के भारतीय आहेत. ते कामानिमित्त तेथे रहात आहेत. ही संख्या ३५ लाख इतकी आहे.