पाकमध्ये शीख योद्धे हरि सिंह नलवा यांची मूर्ती प्रशासनाने हटवली !

शिखांचा संताप

पाकचे गुणगाण गाणारे पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू याविषयी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक

शीख योद्धे हरि सिंह नलवा यांची मूर्ती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हरिपूर जिल्ह्यातील शीख योद्धे हरि सिंह नलवा यांची मूर्ती हटवण्यात आली आहे. यामुळे शीख धर्मियांकडून विरोध करण्यात येत आहे. ही मूर्ती वर्ष २०१७ मध्ये स्थापन करण्यात आली होती. महाराजा रणजीत सिंह यांच्या साम्राज्याची स्थापना आणि त्यांचा विजय यांमध्ये हरि सिंह नलवा यांची प्रमुख भूमिका होती. येथे मूर्ती स्थापन करण्याच्या वेळी प्रशासनाने म्हटले होते की, याद्वारे धार्मिक पर्यटन आणि सहिष्णुता यांना प्रोत्साहन दिले जात आहे; मात्र त्याच प्रशासनाने ही मूर्ती हटवली आहे.