महर्षींच्या आज्ञेनुसार १५.१.२०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञा’चे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१५.१.२०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ झाला. देवाने माझ्याकडून या यज्ञाच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा करवून घेतली. श्रीगुरुकृपेने या यज्ञामध्ये सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे आणि श्री प्रत्यंगिरादेवीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडणार्‍या दैवी ज्ञानाची सूत्रे येथे दिली आहेत. 

१. ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाशी संबंधित असणारे विविध घटक आणि त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

२. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञामध्ये लाल मिरचीच्या आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

लाल रंगाच्या मिरच्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात देवीची मारक शक्ती असल्यामुळे त्यांच्याकडे त्रासदायक शक्ती खेचली गेल्यामुळे त्यांच्यातील तिखटपणा नष्ट झाला. त्यामुळे जेव्हा यज्ञात मिरच्यांची आहुती देण्यात आली, तेव्हा स्थुलातून तिखट वास आला नाही. यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी सनातनच्या साधकांना लागलेली दृष्ट पुष्कळ प्रमाणात नष्ट झाल्यामुळे मिरच्यांकडे काळी शक्ती आकृष्ट होण्याचे प्रमाण न्यून झाले. त्यामुळे यज्ञात मिरच्यांची आहुती दिल्यावर थोड्या प्रमाणात तिखट वास आला. यावरून ‘महर्षींनी श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञामध्ये लाल मिरच्यांच्या आहुती देण्यास का सांगितले आहे ?’, हे लक्षात आले.

३. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरुद्वयींनी परिधान केलेल्या लाल रंगाच्या रेशमी साड्यांतून प्रक्षेपित झालेल्या देवीच्या तत्त्वाचा लाभ संपूर्ण पृथ्वीवरील विविध योनींतील सात्त्विक जिवांना होणे

श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी देवीलोकातून पृथ्वीवरील यज्ञकुंडाकडे श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचे सूक्ष्मतम तत्त्व आले. हे तत्त्व सर्वसामान्य साधकाला ग्रहण करणे शक्य नव्हते. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुद्वयींनी परिधान केलेल्या लाल रंगाच्या रेशमी साड्यांमध्ये श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचे तत्त्व सहजरित्या आकृष्ट होऊन ते सूक्ष्म स्तरावर पृथ्वीच्या वायुमंडलात प्रक्षेपित झाले होते. त्यामुळे देवीचे हे तत्त्व पृथ्वीवरील सर्वसामान्य साधक आणि विविध योनींतील सात्त्विक जीव यांना सहजरित्या ग्रहण करता आले. त्यामुळे त्यांच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन त्यांना आध्यात्मिक लाभ झाला.

४. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये कार्यरत झालेल्या त्रिदेवींच्या तत्त्वाचे प्रमाण

५. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञात लघुपूर्णाहुतीच्या वेळी सद्गुरुद्वयींची समष्टी कल्याणाची तळमळ आणि समष्टीभक्ती पाहून देवी त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होणे अन् तिचे उग्र मारक रूप शांत होऊन सौम्य आणि शांत रूप कार्यरत होणे

संपूर्ण यज्ञामध्ये श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचे रूप उत्तरोत्तर उग्र आणि मारक झाले अन् देवीचे पाताळातील वाईट शक्तींशी घनघोर युद्ध झाले. यज्ञाच्या शेवटी यज्ञात तुपाची लघुपूर्णाहुती देण्यात आली. या वेळी सद्गुरुद्वयींची समष्टी कल्याणाची तळमळ आणि समष्टीभक्ती यांमुळे यज्ञात सूक्ष्मातून प्रगट झालेले श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचे उग्र आणि मारक रूप शांत झाले अन् सौम्य आणि शांत रूप कार्यरत झाले. त्यामुळे वातावरणात जाणवणारी शक्तीची उष्ण स्पंदने न्यून होऊन शांतीची शीतल स्पंदने कार्यरत झाली.

६. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाची फलश्रुती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उपस्थितीत झालेल्या यज्ञातून कार्यरत झालेली श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीची शक्ती अन् चैतन्य यांच्यामुळे साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास ५० टक्के न्यून झाला अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील ३० टक्के अडथळे दूर झाले. अशा प्रकारे महर्षींची आज्ञा, सद्गुरुद्वयींचा संकल्प आणि श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीची कृपा यांच्यामुळे यज्ञाची चांगली फलश्रुती मिळाली.

कु. मधुरा भोसले

७. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या चित्राकडे पाहिल्यावर आलेली अनुभूती

श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या चित्रातील (वर दिलेल्या देवीच्या चित्रातील) देवीकडे पहात असतांना देवीकडून माझ्याकडे पुष्कळ प्रमाणात मारक शक्ती प्रक्षपित होऊन माझ्या देहातील त्रासदायक शक्ती चित्राकडे आकृष्ट झाली. त्यामुळे मला पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ होऊन हलके आणि प्रसन्न वाटत होते.

श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने वंदन : ‘ज्ञानावतार आणि विश्वगुरु असणारे विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण करता आले आणि त्यातून शिकता आले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने वंदन करते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१८.१.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक