‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
४. वैचारिक आतंकवाद्यांपासून हिंदु धर्माला वाचवण्यासाठी त्यांच्या आक्रमक विचारसरणीतील फोलपणा सतत उघड करणे आवश्यक !
आजमितीला वैचारिक आतंकवाद हा आतंकवादाच्या कसोट्यांमध्ये बसत नाही; कारण यात घातपात येत नाही; परंतु विशिष्ट समुहाने त्यांची ध्येये, विचारसरणी आणि जीवनशैली इतर समाजांवर लादण्यासाठी प्रसृत केलेले विचार म्हणजे संस्कृती अन् मूल्ये यांवरचे आक्रमण नसते का ? त्यात एखाद्या व्यक्तीवर नव्हे, तर त्या समाजावर ते विचार लादण्यासाठी खोट्या तत्त्वांचा वापर करून आधी त्या समाजाच्या विचारधारेला समृद्ध होऊ न देणे, नंतर त्या विचारधारेला घायाळ करणे आणि मग तिला नष्ट करून त्या ठिकाणी स्वत:ची विचारधारा आक्रमण करून मोठी करणे. एकदा ही विचारसरणी रुजली की, आधीच्या विचारसरणीच्या नाशाविषयी अभिमान व्यक्त केला जातो. ही प्रक्रिया घातपाताइतकीच बलपूर्वक राबवली जात नसेल का ? दक्षिण अमेरिकेत ‘इन्का एम्पायर’ होते. (इन्का नावाचे दक्षिण अमेरिकेतील भारतियांचे साम्राज्य होते. ते ख्रिस्त्यांनी उलथवले.) तेथे ख्रिस्ती धर्म रुजला. आफ्रिका खंडामध्ये एकतर ख्रिस्ती किंवा इस्लाम रुजवला गेला. पर्शिया गेले आणि तिथे इराण आले. तेथील पूर्वीची विचारसरणी कुठे राहिली ? धर्म हे त्याचे एक टोक आहे. त्यातून अनेक बीजे मूळ बियाण्यांसमवेत रुजली नाहीत का ? हे आपल्याला थांबवायचे असेल, तर आपल्यालाही बोलत रहावे लागेल. ‘त्यांच्या’ प्रश्नांमधील तथ्ये खोडून काढत असतांनाच त्यांच्या सिद्धांतातील आणि कृतीतील फोलपणा यांविषयी आपल्याला खडसावत रहावे लागेल.’
(समाप्त)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)