जो धर्म दुसर्‍याला बाधक ठरतो, तो धर्म नसून तो कुधर्म आहे !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘मागील २ सहस्र वर्षांत कलियुगी धर्मांचा (ज्यांना पंथ म्हणणे उचित ठरेल अशांचा) जन्म आणि प्रचार-प्रसार सनातन धर्माला नष्ट करणे अथवा विरोध करणे यांसाठी झाला आहे. सर्व पंथ त्यांच्या जन्मापासूनच सनातन धर्मावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आघात करत आले आहेत. वेद आणि इतर वैदिक धर्मग्रंथ अन् देवाचे सगुण स्वरूप यांची किंवा त्यांची उपासना यांची निंदा करणे, वैदिक कर्मकांडांची किंवा मृत्यूनंतरच्या धार्मिक विधींची खिल्ली उडवणे, सनातन धर्माच्या अनुयायांचे धर्मपालन आणि साधना यांत बाधा आणणे, त्यांना कपटाने, बळाने किंवा लोभ दाखवून विचारप्रवाहात किंवा पंथात येण्यास प्रवृत्त करणे, या सर्व तथाकथित धर्मांच्या मुख्य पद्धती आहेत. या तथाकथित धर्मांविषयी द्रष्ट्या महर्षि व्यासांनी महाभारतात लिहिले आहे –

धर्मं यो बधते धर्मोन सा धर्मः कुधर्म तत् ।
अविरोधात तु यो धर्मः सा धर्मः सत्यविक्रम ।।

– महाभारत, शांतीपर्व

अर्थ : जो धर्म इतरांना बाधक होतो, तो धर्म नसून कुधर्म आहे. खरा धर्म तोच आहे, जो कोणत्याही धर्माला विरोध करत नाही.’

– पू. तनुजा ठाकूर (१२.११.२०२१)