गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सांगणारी घटना !
नगर – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड जिल्ह्यात गोमांस घेऊन जाणार्या टेंपोला आरणगाव-जामखेड रस्त्यावर पकडले. त्यामध्ये ९ लाख रुपये मूल्याचे ६ सहस्र किलो गोमांस आणि टेंपो असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टेंपोचालक नदिम मन्यार, मुजफ्फर शेख, रईस शेख यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, तर नदीम आणि मुजफ्फर यांना अटक केली आहे.