लाच स्वीकारणार्या आरोग्य अधिकार्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. भ्रष्टाचाराची ही कीड मुळापासून नष्ट होण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हवे. – संपादक
पुणे – महापालिकेच्या स्वप्निल कोठावळे या आरोग्य निरीक्षकांना येरवडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी व्यक्तीकडून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना कह्यात घेतले. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार यांचा वैयक्तिक टेम्पो असून कचरा उचलून येरवडा कचरा डेपोत टाकण्यासाठी आणि टेम्पोचे काम चालू ठेवण्यासाठी कोठावळे यांनी प्रतिमास ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे या प्रकरणाचे अन्वेषण करीत आहेत. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.