दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी स्वतःकडून होणार्‍या व्याकरणाच्या आणि संकलनाच्या चुका न्यून होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता वाढणे

दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी स्वतःकडून होणार्‍या व्याकरणाच्या आणि संकलनाच्या लहान-मोठ्या चुका न्यून होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता वाढणे

नियतकालिकांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी 

‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं (मीपणाची जाणीव) यांमुळे त्यांच्याकडून सेवेत व्याकरणाच्या आणि संकलनाच्या लहान-मोठ्या चुका होतात. यामुळे साधकांची साधना व्यय होते. सेवेत होणार्‍या चुकांचा अभ्यास करणे, त्याच त्याच चुका पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करणे, चुकांसाठी योग्य प्रायश्चित्त घेणे (चुकांमुळे साधकाची साधना व्यय होते; योग्य प्रायश्चित्त घेतल्याने चुकांचे काही प्रमाणात तरी परिमार्जन होते आणि साधकांची साधना वाचते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना नेहमी योग्य प्रायश्चित्त घेण्यास सांगतात.) इत्यादी गोष्टींचा संस्कार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांवर केला आहे. २०.५.२०२१ पासून परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिकातील चुका लक्षात आणून द्यायला आरंभ केला. त्यानंतर दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी स्वतःकडून होणार्‍या चुकांचे सखोल चिंतन करून ‘साधनेत मी कुठे अल्प पडतो?’, हे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना काढून नेटाने प्रयत्न करण्यास आरंभ केला. त्यामुळे काही मासांतच त्यांच्याकडून होणार्‍या चुकांचे प्रमाण पुष्कळ उणावले. याचा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेवर काय परिणाम झाला ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि निष्कर्ष पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पुढील २ अंकांची ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

अ. अल्प चुका असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक : जून २०२१ मधील दुसर्‍या सप्ताहापासून दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी चुका न होण्यासाठी प्रयत्न चालू केले. हा १६.६.२०२१ या दिवशीचा अंक आहे. यामध्ये त्या मासातील अन्य दिवसांच्या तुलनेत परात्पर गुरु डॉक्टरांनी अल्प चुका कळवल्या होत्या.

आ. चुका नसलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक : ऑक्टोबर २०२१ पासून दैनिकातील चुका पुष्कळ अल्प होत गेल्या. हा २.१०.२०२१ या दिवशीचा अंक आहे. यामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी एकही चूक सांगितली नाही.

२. अल्प चुका असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळून येणे; पण चुका नसलेल्या दैनिकामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा असणे

अल्प चुका असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा आढळून आली. चुका नसलेल्या दैनिकामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते. (पुढील सारणीत सर्वाधिक चुका असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचीही निरीक्षणे दिली आहेत.)

सौ. मधुरा कर्वे

३. निष्कर्ष

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २४.५.२०२१ या दिवशीच्या अंकामध्ये सर्वाधिक चुका होत्या. या अंकातील ‘इन्फ्रारेड’ नकारात्मक ऊर्जा ८.७२ मीटर आणि सकारात्मक ऊर्जा ६.०६ मीटर होती. सर्वाधिक चुका असलेल्या अंकापेक्षा अल्प चुका असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या (१६.६.२०२१ या दिवशीच्या) अंकात नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प असून त्यातील सकारात्मक ऊर्जा अनुमाने ८ मीटरने अधिक आहे.

अल्प चुका असलेल्या अंकापेक्षा चुका नसलेल्या (२.१०.२०२१ या दिवशीच्या) अंकातील सकारात्मक ऊर्जा २६.८० मीटरने अधिक आहे. यातून ‘साधकांनी स्वतःकडून होणार्‍या चुकांचे प्रमाण न्यून होण्यासाठी तळमळीने केलेल्या प्रयत्नांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेवर केवढा सकारात्मक परिणाम झाला’, हे लक्षात येते. थोडक्यात कोणतीही सेवा चुकांविरहित आणि परिपूर्ण केली, तर त्यातून साधकांची साधना वृद्धींगत होते’, हेही लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.१०.२०२१)

ई-मेल : [email protected]