‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा, म्हणजे आनंददायी अष्टांग साधनाच आहे’, असा भाव असणारे श्री. अनंत राजाराम परुळेकर (वय ६८ वर्षे) !

श्री. अनंत राजाराम परुळेकर

१. दैनिक ‘सनातन प्रभात’चे पार्सल बसस्थानकावर जाऊन घेणे

‘मी सकाळी सात वाजता देवगड बसस्थानकावर जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’चे पार्सल घेतो. नंतर मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक मोजून अंक अल्प असल्यास पुन्हा संपर्क करून ते दुसर्‍या दिवशी पाठवण्याची विनंती करतो. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ घरोघरी जाऊन वितरण करतो आणि अन्य ठिकाणचे दैनिक ‘सनातन प्रभात’ एका हितचिंतकांच्या दुकानात ठेवतो. मी जामसंडे येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक एका साधिकेच्या घरी ठेवतो.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक वाचकांना देणे

अ. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ हस्ते-परहस्ते न देता वाचकांच्या हातात होतो. त्यांचे घर बंद असल्यास मी अंक दाराच्या कडीला अडकवून ठेवतो. दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरण करतांना मला खरा आनंद होतो. अंक देतांना एक चूक झाली, तरी सेवा पूर्ण होत नाही आणि सेवा केल्याचा आनंद मिळत नाही.

आ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरण सेवेमुळे साधक आणि समाजातील वाचक यांच्या संपर्कात नियमितपणे रहाता येते. अन्य साधकांकडे असलेल्या सेवाही करता येतात.

इ. दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतांना काही चूक झाल्यास उत्तरदायी साधक मला त्याची जाणीव करून देतात. ही जाणीव मला माझे स्वभावदोष आणि अहं अल्प करण्यास साहाय्य करते. समाजातील वाचकांना एक दिवस जरी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक उशिरा मिळाला, तरी ते बोलतात. त्या वेळी त्यांचे बोलणे ऐकतांना आपला अहं अल्प करण्यास साहाय्य होते.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतांना होत असलेली अष्टांग साधना !

अ. दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतांना माझा नामजप चालू असतो. मला साधक आणि समाजातील वाचक यांचा सत्संग मिळतो अन् दैनिक वितरणाची सेवाही होते.

आ. ही सेवा करतांना तनाचा त्याग होतो. प्रवासासाठी इंधन लागते. त्यामुळे धनाचा त्याग होतो. साधक आणि समाजातील वाचक यांच्या संपर्कात राहिल्यामुळे प्रीती निर्माण होते. त्यांच्या समवेत बोलल्यामुळे स्वतःतील स्वभावदोष समजतात आणि ते घालवण्यासाठी प्रयत्न होतात.

इ. उन्हाळ्यात ही सेवा करतांना कसलाही अडथळा येत नाही; परंतु पावसाळ्यात ही सेवा काळजीपूर्वक करावी लागते. पाऊस चालू असतांना रेनकोट घातला, तरी पूर्ण भिजायला होते. अतीवृष्टी असतांना ‘पिशवीतील दैनिक ‘सनातन प्रभात’ काढून घ्या’, असे वाचकांना सांगावे लागते. अतीवृष्टीच्या वेळी भगवान श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांना ‘हे परमेश्वरा, मी तुमचा संदेश घेऊन घरोघरी जात आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा होईपर्यंत पावसाला थोडी विश्रांती घेऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर पाऊस थांबायचा आणि अंक सुरक्षित असायचे. ‘मी वितरण करून घरी आल्यावर मात्र पुष्कळ पाऊस पडायचा’, अशी अनुभूती मी पुष्कळ वेळा घेतली आहे. त्या वेळी माझी भावजागृती व्हायची.

ई. एक मास पूर्ण झाल्यानंतर समाजातील वाचक स्वतः देयकाची चौकशी करतात आणि वेळेत पैसे देतात. सुट्या पैशांची अडचण असल्यास ते ‘शेष पैसे अर्पण पेटीत टाका’, असे सांगतात. तेव्हा ‘त्यांचा सनातन संस्थेवर किती विश्वास आहे !’, असे लक्षात येऊन भावजागृती होते.

उ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा, म्हणजे आनंददायी अष्टांग साधनाच आहे’, असे मला वाटते. ही सेवा साधनेसाठी पोषक आहे, तरी ‘प्रत्येक साधकाने ही सेवा करून त्याचा लाभ करून घ्यावा’, असे मला वाटते. ही सेवा नामासहित झाली, तरच त्यातून आनंद मिळतो आणि मिळणार्‍या आनंदातून आपली प्रगती होणार आहे. ही सेवा केवळ दोन घंट्यांची असते; परंतु मिळणारा आनंद दिवसभराचा असतो.

‘प.पू. गुरुमाऊली, हे तुम्हीच मला सुचवले आणि माझ्याकडून लिहून घेतले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अनंत राजाराम परुळेकर, देवगड, जामसंडे, जि. सिंधुदुर्ग. (२५.१०.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक