बांगलादेशात ‘इस्कॉन’ मंदिरासह नवरात्रीत श्री दुर्गापूजा मंडपांवर हिंसक आक्रमणे !
हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
कोल्हापूर, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेशच्या नौखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर ‘इस्कॉन’च्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांध मुसलमानांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताईदास प्रभु आणि जतनदास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थदास यांची हत्या केली. एका हिंदु कुटुंबातील एक महिला आणि दोन मुली यांवर बलात्कार केला. नवरात्रीच्या कालावधीत बांगलादेशातील कॉमिला जिल्ह्यात मुसलमानांनी हिंदूंवर आणि श्री दुर्गादेवीच्या ९ पूजा मंडपांवर आक्रमणे करून ४ हिंदूंना ठार केले होते. बांगलादेशात हिंदूंवर सुनियोजित पद्धतीने आक्रमणे चालू असून शेकडो हिंदू गंभीररित्या घायाळ झालेले आहेत. तेथे हिंदु समाज हा पूर्णपणे असुरक्षित असून बांगलादेश हिंदूंसाठी एकप्रकारे नरक बनला आहे. तेथील सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाही. त्यामुळे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वत: बांगलादेशाच्या पंतप्रधानांशी संवाद साधून हस्तक्षेप करावा. तेथील हिंदूंना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना पूर्ण सुरक्षितता प्रदान करावी, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे आणि श्री. विक्रम चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे उपस्थित होते. याच मागणीचे निवेदन शाहूवाडी येथे नायब तहसीलदार विलास कोळी यांना देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ, श्री. वसंत चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, श्री. अनंत ढोणे, वैद्य संजय गांधी उपस्थित होते.
जळगाव, चोपडा, भुसावळ आणि धुळे येथेही प्रशासनाला निवेदन !
जळगाव, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – अशाच मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १८ ऑक्टोबर या दिवशी जळगाव, चोपडा, भुसावळ, धुळे येथील प्रशासनाला देण्यात आले. जळगाव येथील अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, चोपडा येथील प्रांताधिकारी सुमित शिंदे, भुसावळ येथील उपविभागीय दंडाधिकारी रामसिंग सुलाने, धुळे येथील उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना जळगाव येथे श्री. राहुल गोटे, बजरंग दलाचे श्री. राहुल धनगर, श्री. विशाल सुरडकर, ‘हिंदु राष्ट्र सेने’चे श्री. मोहन तिवारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल जोशी, भुसावळ येथे सर्वश्री मंदार जोशी, प्रवीण भोई, सचिन बडगे, भूषण महाजन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रितेश जैन, गोसेवक श्री. मयूर सावकारे, ‘इस्कॉन’चे श्री. योगेश बैरागी उपस्थित होते.
चोपडा येथे भाजप जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, शहर अध्यक्ष श्री. गजेंद्र जैस्वाल, चुंचाळेचे उपसरपंच श्री. शुभम चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राजू स्वामी, शिवसेनेचे श्री. राजाराम पाटील, बजरंग दलाचे श्री. ललित चांदवडकर, चुंचाळे ग्रामपंचायत सदस्या सौ. ज्योत्स्ना चौधरी, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप नेवे उपस्थित होते.