नवरात्रीनिमित्त सर्व साधकांकडून ‘सनातनच्या नवदुर्गां’ना साष्टांग नमन !

सौ. आनंदी पांगुळ

सनातनने दिल्या
आम्हाला ‘नवदुर्गा’।
सनातनने दिल्या
आम्हाला नवदुर्गा ।
ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज
यांनी सजल्या सार्‍या ।। १ ।।

रामनाथीच्या पावनक्षेत्री राहून
घेते सर्वांच्या साधने चे दायित्व ।
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ।। २ ।।

जगभर भ्रमण करून शोधते चैतन्यस्रोतांना ।
नाव तयांचे असे श्रीचित्‌‌शक्ति
(सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ।। ३ ।।

जिल्ह्याजिल्ह्यांतील सर्व साधक आणि जिज्ञासू यांना ।
साधनेचा मार्ग दाविती सद्गुरु (कु.) स्वाती खाडये अन्
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर ।। ४ ।।

साथ तयांना देती पू. (सौ.) संगीता जाधव ।
देवद आश्रमातील साधकांना घडवती
पू. (सौ.) अश्विनी पवार ।। ५ ।।

दक्षिण भारतातील हिंदु धर्माची उज्ज्वल परंपरा सांभाळून ।
भावपूर्ण चित्ररेखाटन करती पू. (सौ.) उमा रविचंद्रन् ।। ६ ।।

साधकांवर असे अन्नपूर्णामातेचा सदा वरदहस्त ।
त्यासाठी रामनाथी आश्रमी श्रम करती
पू. (कु.) रेखा काणकोणकर ।। ७ ।।

विदेशातील हिंदू आणि साधक यांना संघटित करती ।
त्यासाठी रात्रंदिन सेवारत रहाती पू. (सौ.) भावनाताई ।। ८ ।।

नवरात्रीच्या या पावन समयी साष्टांग नमन या नवदुर्गांना ।
आशीर्वचन द्या हो आम्हा सनातनच्या सर्व लेकरांना ।। ९ ।।

घडवूनी या नवदुर्गांना परात्पर गुरु डॉक्टर
पसरवती चैतन्य जगभर  ।
भावपूर्ण कृतज्ञतापुष्पे त्यांच्या सुकोमल पावन चरणांवर ।। १० ।।

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.९.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक