भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकाच्या मनातील जाणून मार्गदर्शन केल्याची साधकाला आलेली प्रचीती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
श्री. विजय पाटील

‘२३.४.२०२० या दिवशी झालेल्या भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी महाभारतातील ‘भगवान श्रीकृष्ण, चिमणी आणि तिची पिल्ले’ यांच्याविषयी गोष्ट सांगितली. मी ही गोष्ट ‘व्हॉट्सॲप’वर आलेल्या एका संदेशात वाचली होती. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी ही गोष्ट सांगायला आरंभ केल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘ही गोष्ट मला ठाऊक आहे. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई पुढे काय सांगणार आहेत ?’, हे मला ठाऊक आहे.’

माझ्या मनात हा विचार आल्याक्षणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी गोष्ट थांबवून सांगितले, ‘‘आपल्याला द्वापरयुगातील वातावरण अनुभवायचे आहे. त्या वातावरणात जायचे आहे.’’ त्यानंतर त्या पुढील गोष्ट सांगू लागल्या. हे सर्व काही क्षणांतच घडले. तेव्हा मला वाटले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना जणू काही माझ्या मनातील विचार लक्षात आला आणि ‘मला भावसत्संगाचा लाभ घेता यावा’, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.’ नंतर उर्वरित गोष्ट ऐकत असतांना मला भाव अनुभवता आला.

मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विजय पाटील, वापी, गुजरात. (२४.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक