फेब्रुवारी २०२० मध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ श्री सरस्वतीदेवीला हवन करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१५.२.२०२०

१. ‘१५.२.२०२० या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सरस्वतीदेवीला हवन देत होत्या. त्या वेळी ‘त्यांच्या उजव्या बाजूला शिवस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आणि डाव्या बाजूला भवानीमाता बसली आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्यामुळे शिव आणि शक्ती यांच्या उपस्थितीत अन् त्यांच्या संरक्षककवचात याग चालू आहे’, असे मला जाणवले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांतून शक्ती प्रक्षेपित होऊन ती यज्ञकुंडाच्या दिशेने जात होती. (परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही केवळ श्री सरस्वतीदेवीला वंदन करण्यासाठी यज्ञस्थळी आले होते.’ – संकलक) ‘त्यामुळे यज्ञकुंडाभोवती संरक्षककवच निर्माण होत आहे’, असे मला वाटले. ती शक्ती यज्ञकुंडात प्रवाहित होत असतांना ‘यज्ञाच्या माध्यमातून समष्टीत प्रसारित होत आहे’, असे मला जाणवले. ‘त्या शक्तीमुळे यागातील अडथळे दूर होत आहेत’, असे वाटले.

सौ. रंजना गडेकर

३. अग्नीच्या ज्वाळांकडे पाहून ‘त्या आहुती लगेच स्वीकारल्या जात आहेत’, असे मला जाणवत होते.

४. मी नामजप करतांना सूक्ष्मातून आहुती देत होते. त्या वेळी मला आध्यात्मिक स्तरावरील उपायांची परिणामकारकता जाणवत होती; कारण मला ढेकरा येत होत्या आणि माझ्या हाताला चांगल्या संवेदना जाणवत होत्या.

१६.२.२०२०

१. परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये ‘एक पांढरा पट्टा आहे’, असे मला जाणवत होते. ‘त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांकडील शक्ती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दिशेने जाऊन त्यांना यज्ञ करण्यास शक्ती मिळत होती. ‘तोच हा पट्टा आहे’, असे माझ्या लक्षात आले.

आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे यज्ञाच्या वेळी ध्यान लागले आणि ‘मला होणारा आध्यात्मिक त्रास न्यून झाला’, असे मला जाणवले. माझ्या मनात येणारे विचार न्यून झाले आणि वातावरणात श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व पसरल्यामुळे मी त्रासदायक स्थितीतून बाहेर आले. ‘मी माझ्या मनाची वेगळीच सकारात्मक स्थिती अनुभवत आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘यज्ञकुंडातून सरस्वतीचे निर्गुण तत्त्व वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘यज्ञकुंडातील ज्वाळांच्या माध्यमातून सरस्वतीदवीचे तत्त्व वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

२०.२.२०२०

अ. सरस्वतीचे हवन चालू असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना खोकला आला. मी सभागृहात बसून हवन पहात होते, तरी त्यांना खोकला आल्यावर मलाही खोकला आला. तेव्हा मला होणारा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन माझे काही वेळ ध्यान लागले.

२३.२.२०२०

अ. २३.२.२०२० या दिवशी हवनाचा शेवटचा दिवस होता. पूर्णाहुतीच्या वेळी मला ज्वाळा पुष्कळ तेजस्वी वाटत होत्या. तेव्हा श्री सरस्वतीदेवी प्रगट झाल्याचे मला जाणवत होते. ती यज्ञकुंडावर कमळात वीणेसह बसलेली दिसत होती आणि त्याच वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी तिला नमस्कार केलेला दिसला. नंतर सरस्वतीदेवी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहात विलीन होतांना दिसली.

आ. याग चालू होण्यापूर्वी मला वातावरणात दाब जाणवत होता; परंतु याग झाल्यावर मला शीतलता जाणवली.’ (महर्षींचे आज्ञापालन म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ नाडीपट्टीनुसार सांगितलेल्या यज्ञांच्या हवनामध्ये सहभागी होतात. – संकलक)

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.