‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा ६.१०.२०२१ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करत आहे.
श्रीसत्शक्ति ताईंचे (टीप १) सुरक्षाछत्र असता शिरी ।
साधकांना नसे आपत्काळी चिंता, काळजी अन् भीती ।। १ ।।
श्रीसत्शक्ति भाववृद्धी सत्संगातून उधळती भावमोती ।
गुरुमाऊली साधकांची आध्यात्मिक प्रगती करवून घेती ।। २ ।।
श्रीसत्शक्ति साधकांच्या साधनेची घडी बसवती जगती ।
हिंदु राष्ट्राची मधुर फळे साधक चाखती सनातनच्या आश्रमी ।। ३ ।।
श्रीसत्शक्ति श्री गुरूंचे (टीप २) चैतन्य अन् कीर्ती पसरवती त्रिभुवनी ।
धर्मजागृती अन् हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्र येईल सत्वरी ।। ४ ।।
श्रीसत्शक्ति आमुची माऊली, असे सच्चिदानंद शक्तीदायिनी ।
मानवाच्या उद्धारा सनातनच्या इतिहासात त्रिगुरु (टीप ३) प्रगटले त्रिभुवनी ।। ५ ।।
श्रीसत्शक्ति असती गुरुपरंपरेतील ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ ।
अमावास्येच्या जन्मदिनी त्रिवार वंदन श्रीसत्शक्ति ताईंच्या चरणी ।। ६ ।।’
टीप १ : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
टीप २ : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
टीप ३ : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल (२८.९.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |