मये, डिचोली, गोवा येथे रहाणार्‍या श्रीमती यशोदा वसंत गावकर (वय ६५ वर्षे) यांना विविध प्रसंगी आलेल्या अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. राधा घनश्याम गावडे यांच्या आई श्रीमती यशोदा वसंत गावकर यांना नामजप आणि सेवा आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

श्रीमती यशोदा गावकर

१. साधिका एकटीच आरती करतांना तिने श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यानंतर तिच्या नाती आणि सूनबाई आरतीसाठी येणे

‘एकदा सायंकाळी मी एकटीच आरती करत होते. तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘तूच माझ्या दोन्ही नातींना आरतीला येण्याची बुद्धी दे.’ मी अशी प्रार्थना केल्यावर दोघी जणी माझ्या शेजारी आरती करायला उभ्या राहिल्या. माझी सूनही आरती करण्यासाठी आली.

२. एकदा मी डोळे मिटून नामजप करत होते. तेव्हा मला एकदम प्रकाश आणि वेलीची पाने दिसली. मला त्या प्रकाशात परात्पर गुरु डॉ. आठवले नारायणाच्या रूपात दिसले.

३. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गुरुजींच्या सांगण्यानुसार मुलगा गणपतीची पूजा करत असतांना मूर्तीत श्री गणेशाचे अस्तित्व जाणवणे आणि भावजागृती होणे

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करत असतांना गुरुजींनी माझ्या मुलाला सांगितले, ‘‘गणेशतत्त्व मूर्तीत येण्यासाठी गणपतीच्या छातीवर हात ठेव.’’ नंतर गुरुजींनी मंत्र म्हणायला आरंभ केला. त्या वेळी मला मूर्तीत श्री गणेशाचे अस्तित्व जाणवले. मला चैतन्य जाणवून माझी भावजागृती झाली.

४. एकदा घरी श्री. निरंजन चोडणकर आले होते. त्यांना बघून माझी भावजागृती झाली. मला वाटले, ‘श्रीकृष्ण घरी आला आहे.’ त्यांनी मला ‘आई’ अशी हाक मारल्यावर ‘श्रीकृष्णाने हाक मारली’, असे मला वाटले.’

५. भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न 

अ. मी माझ्या नातींसाठी स्वयंपाक बनवतांना ‘देवानेच या बाळगोपाळांना घरी पाठवले आहे. मी त्यांची सेवा करते’, असा मनात भाव असतो.

आ. प्रत्येक रविवारी मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचकांच्या घरी द्यायला जाते. तेव्हा ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे’, असे मला जाणवते. घरी आल्यावर मी कृतज्ञता व्यक्त करते.

– श्रीमती यशोदा वसंत गांवकर, मये, डिचोली, गोवा. (२३.१०.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक