‘सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाईआजी यांचा आज भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी (२९.९.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. पू. (सौ.) आजी आणि सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाईआजोबा सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास आहेत. पू. (सौ.) मालिनी देसाईआजी यांच्या वाढदिवसानिमित्त साधिकेला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पू. (सौ.) मालिनी देसाई यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. साधिका रात्री झोपायला गेल्यावर पू. (सौ.) देसाईआजींनी ‘तू सेवा करून दमली असशील, थोडा खाऊ खा’, असे म्हणून स्वतः उठून साधिकेला प्रेमाने खाऊ देणे मी सेवा करून रात्री पू. देसाईआजी आणि पू. आजोबा यांच्या खोलीत झोपायला जायचे. मी जाण्यापूर्वी पू. आजी माझ्यासाठी वाटीत खाऊ काढून ठेवायच्या. मी गेल्यावर त्या झोपलेल्या असल्या, तरी उठायच्या आणि मला जवळ बोलावून म्हणायच्या, ‘‘तू सेवा करून दमली असशील ना, थोडा खाऊ खा आणि मग झोप.’’ त्या वेळी ‘संत साधकांची किती काळजी घेतात ?’, असे मला वाटायचे. त्यांचे हे प्रेम बघून माझा भाव जागृत व्हायचा.
२. रात्री खोलीत झोपल्यावर पू. आजी आणि पू. आजोबांकडून डाव्या-उजव्या अशा दोन्ही बाजूंनी चैतन्य अन् शक्ती मिळून साधिकेला आनंददायी स्थिती अनुभवता येणे त्यांच्या खोलीत झोपतांना मला ‘माझ्या डाव्या बाजूने पू. आजींकडून गुलाबी रंगाचे चैतन्य आणि शक्ती मिळत आहे, तर उजव्या बाजूने पू. आजोबांकडून पिवळ्या रंगाचे चैतन्य अन् शक्ती मिळत आहे’, असे जाणवायचे. त्यामुळे दिवसभर थकलेल्या शरिराला शांत झोप लागायची. अंतर्मन गुरूंच्या स्मरणात असल्याने मला आनंददायी स्थिती अनुभवायला मिळायची. तेथे मला ‘आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे जाणवायचे.
३. ‘संतांचे दर्शन म्हणजे सूर्यदेवतेचे दर्शन’, असे म्हणून साधिकेने पू. आजींना नमस्कार करणे आणि ‘हे वाक्य परात्पर गुरुदेवच स्वतःच्या तोंडून बोलले’, असे साधिकेच्या लक्षात येणे
एकदा सकाळी मी पू. आजींच्या खोलीबाहेर सेवेला गेल्यावर मला पू. आजी सूर्यदेवाला नमस्कार करतांना दिसल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘मी उठल्यावर सर्वप्रथम सूर्यदेवाला नमस्कार करते.’’ मी त्या दिवशी सूर्यदेवाला नमस्कार केला नव्हता. नंतर मी पू. आजींना म्हणाले, ‘‘माझ्यासाठी संतांचे दर्शन, म्हणजेच सूर्यदेवतेचे दर्शन ! मी आता तुम्हालाच नमस्कार करते.’’ थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की, हे मी बोलले नसूनच परात्पर गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) माझ्या तोंडून बोलले आहेत !
सनातनचे संत म्हणजे साधकांसाठी सूर्यदेवच आहेत. सूर्यदेव केवळ सकाळी प्रकाश देतो; पण सनातनचे संत रात्रीही ज्ञानाचा प्रकाश देत असतात.
कृतज्ञता गुरुदेव !’
– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |