वाचा नवीन सदर… : ‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांना ज्या चुका अनेक वेळा वाचूनही लक्षात आलेल्या नसतात, त्या चुका एकाच वाचनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात येतात. ते त्या सर्व चुका ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात कळवतात. ‘चुकांचे प्रमाण अल्प होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून कशा प्रकारे प्रयत्न करवून घेतले ?’, तो भाग २२ आणि २९ ऑगस्ट या दिवशी आपण पाहिला. आजच्या लेखात परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातील विरामचिन्हांच्या संदर्भात लक्षात आणून दिलेल्या चुका, योग्य काय असावे आणि साधकांनी घेतलेले प्रायश्चित्त येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/506759.html
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, सनातन प्रभात नियतकालिके (१३.८.२०२१)
पाट्याटाकूपणे सेवा केल्याने होणारी साधनेची हानी लक्षात घेऊन प्रत्येक सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा !‘वरवर लहान वाटणार्या चुकांमुळेही साधनेची कशी हानी होते’, हे दाखवून ‘परिपूर्ण सेवेचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवणे’, हा या सदराचा मुख्य उद्देश आहे. यासंदर्भात साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावे. १. दैनिक सात्त्विक असल्यास त्याचा वाचकांवर चांगला परिणाम होतो. दैनिक सात्त्विक होण्यासाठी त्यात चुका नसणे आवश्यक आहे. २. चुका होऊ न देणे, ही कृतीच्या स्तरावरील साधना असते. चुकांविरहित आणि परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न केल्याने त्या माध्यमातून दैनिक विभागातील साधकांची व्यष्टी साधना होते. त्यातून अन्य साधक आणि वाचक यांनाही शिकायला मिळते. त्यामुळे या चुका सदर स्वरूपात प्रकाशित करत आहोत. ४. या सदरात शुद्धलेखनाच्या एरव्ही ‘किरकोळ’ वाटणार्या चुकांचाही उल्लेख केला आहे. याचे कारण – अ. यातून ‘साधक आणि वाचक यांना शुद्धलेखन कसे करावे ?’, ते कळेल आणि त्यांचेही शुद्धलेखन सुधारेल. आ. शुद्ध म्हणजेच सात्त्विक. लेखन शुद्ध झाले की, सात्त्विकताही वाढेल. यातून साधकांची व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरांवर साधनावृद्धी होईल. ५. या सदरांतर्गत ‘अधिक चुका असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘अल्प चुका असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेऊन साधकांना सूक्ष्मातून काय जाणवले’, यासंदर्भातील लिखाण प्रसिद्ध होणार आहे. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे ‘अधिक चुका असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि अल्प चुका असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ यांची चाचणी करण्यात आली. तिची परीक्षणे आणि विश्लेषणही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यातून ‘व्याकरणशुद्धीमुळे लिखाणातील नकारात्मकता अल्प होऊन सकारात्मकता किती वाढते ?’, हेही लक्षात येईल. ६. या सदराच्या माध्यमातून सर्वांनाच ‘सनातनमध्ये साधकांना कशा प्रकारे घडवले जाते ?’, हेही कळेल. ७. इतर नियतकालिकांमध्येही प्रत्येक पानावर ५-१० चुका असतात. त्या सुधारण्यासाठी त्यांनाही दिशा मिळेल. या सदरातील चुका वाचून साधकांनी स्वतःकडून पाट्याटाकू वृत्तीने सेवा होत नाही ना, याचा अभ्यास करावा. चुकांमुळे होणारी हानी लक्षात घेऊन सर्वत्रच्या साधकांनी प्रत्येक टप्प्यावर परिपूर्ण सेवा केल्यास त्यांची सेवा अन् साधना यांची फलनिष्पत्ती वाढून आध्यात्मिक उन्नती जलद होईल !’ लिखाणातील चुका कायमच्या दूर करण्यासाठी चूक होण्यामागील दोष शोधून त्यासंदर्भात स्वयंसूचना घ्याव्यात !दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य अल्प होऊन नकारात्मकता वाढू नये’, यासाठी प्रतिदिन होणार्या चुकांवर प्रायश्चित्त घेण्याची पद्धत चालू केली. त्याचा परिणाम म्हणून प्रक्रिया आरंभ केल्यापासून ३ मासांत चुका अल्प होण्यास आरंभ झाला आहे. चुका कशा अल्प करायच्या, हे वाचकांना कळावे, यासाठी हे सदर चालू करण्यात आले आहे. साधकांनी लिखाणातील चुका कायमच्या दूर व्हाव्यात, यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत प्रयत्न करावेत. स्वतःचा कोणता दोष अथवा अहं यांमुळे चुका होतात, त्याचे चिंतन करून तो दूर करण्यासाठी स्वयंसूचना घ्याव्यात.’ स्वतःकडून चूक झाल्याचे कळल्यावर वाईट वाटले, तरच त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न होतो !‘साधना करतांना झालेल्या चुकांकडे बघण्याचा दृष्टीकोन केवळ ‘त्या शिकण्यासाठी आहेत’, असा वरवरचा राहिला, तर त्यातून अपेक्षित पालट होण्याची गती अतिशय अल्प रहाते. चूक झाल्याचे कळल्यावर प्रथम ‘माझ्याकडून ही चूक झाली’, याची खंत वाटली पाहिजे आणि वाईट वाटले पाहिजे. ही प्रक्रिया झाली, तरच त्या चुकीतून शिकणे होऊन जलद आध्यात्मिक प्रगती होऊ शकते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510558.html